Join us  

आमदाराची लेक कलाविश्वात ठरली अपयशी; 20 वर्षात एकही दिला नाही हिट सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2024 11:12 AM

Bollywood actress: जवळपास २० वर्षापासून ती इंडस्ट्रीत सक्रीय आहे. मात्र, आजपर्यंत तिला एकाही सिनेमात लीड रोल मिळालेला नाही.

कलाविश्वात नशीब आजमावावं असं स्वप्न उराशी बाळगून अनेक जण इंडस्ट्रीत पदार्पण करतात. यात काहींची स्वप्न पूर्ण होतात. तर, काहींच्या पदरात मात्र, अपयश येतं. यात सध्या अशा एका अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे जिने तिच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र तरी सुद्धा तिच्या पदरात अपयशच आलं. विशेष म्हणजे ती आमदाराची लेक असूनही इंडस्ट्रीत तिचा जम बसवू शकली नाही.

नेहा शर्मा (neha sharma) हे नाव अनेकांना ठावूक असेल. बिहारच्या भागलपूरमध्ये जन्मलेली नेहा एका राजकीय कुटुंबात वाढली. मात्र, तिने राजकारणाऐवजी कलाविश्वाची वाट धरली. नेहा शर्मा बिहारचे विधानसभा सदस्य अजित शर्मा यांची लेक असून तिने स्वबळावर बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. इंडस्ट्रीत आल्यानंतर नेहाने काही मोजक्या सिनेमात काम केलं. मात्र, तिच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर फारशी चालली नाही. त्यामुळे सध्या ती काय करते हा प्रश्न अनेकांना पडतो.

इंडस्ट्रीत येण्यापूर्वी नेहा फॅशन डिझायनर म्हणून काम करत होती. त्यानंतर तिने इंडस्ट्रीत पदार्पण केलं. क्रूक या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. नेहा जवळपास २० वर्षांपासून इंडस्ट्रीत सक्रीय आहे. परंतु, अद्यापही तिला मुख्य भूमिका असलेला सिनेमा मिळालेला नाही. मात्र, ती सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.

नेहा सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून तिचा चाहतावर्ग मोठा आहे. नेहा कायम तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लाइफस्टाइलमुळे चर्चेत येत असते. नेहाने आतापर्यंत यमला पगला दिवाना, तान्हाजी, मुबारकासारख्या चित्रपटात काम केलं आहे. तसंच तिने साऊथ सिनेमातही काम केलं आहे.

टॅग्स :नेहा शर्माबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमाTollywood