Join us

मिथिला पालकरने असा साजरा केला ३२ वा वाढदिवस, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 14:39 IST

मिथिलाच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Mithila Palkar : सेलेब्सचं बर्थडे सेलिब्रेशन थोडं खास, थोडं हटके असतं. अभिनेत्री मिथिला पालकरने नुकताच तिचा ३२वा वाढदिवस (Mithila Palkar Birthday) साजरा केला.  बर्थडे सेलिब्रेशनचे काही खास फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहताच सोशल मीडियावर तिला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छाही दिल्याचे पाहायला मिळत आहे.

मिथिलाने वाढदिवसानिमित्त  काळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता. मिथिलाच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.  "वाढदिवशी मिळालेल्या प्रेमाबद्दल सर्वांचे आभार! ११.०१.२०२५... मी नेहमी म्हणते, माझ्या आयुष्यात मला सर्वोत्तम माणसं मिळाली आहेत. ते कायमच माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करतात. यासाठी आभारी आहे",  असे कॅप्शन तिने शेअर केलेल्या फोटोला दिले आहे.

 १२ जानेवारी १९९३ रोजी  मुंबईतील एका मराठी कुटुंबात जन्मलेल्या मिथिलानं बॉलिवूडमध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर मिथिलाने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. सिनेमा, मालिकांपेक्षा मिथिला वेबसीरिजमध्ये जास्त रमताना दिसते.

मिथिलाला 'गर्ल इन द सिटी' मधून खूप लोकप्रियता मिळाली. यानंतर मिथिलाला 'लिटिल थिंग्स'मध्ये दिसली. या वेबसिरीजने तिचं  नशीब बदललं. तसेच मिथिला ही कंगना राणौत आणि इमरान खान यांच्या 'कट्टी बट्टी' या चित्रपटात दिसली होती. यानंतर मिथिला इरफान खान, दुल्कर सलमानसोबत 'कारवां', अभय देओलसोबत 'चॉपस्टिक' आणि काजोल आणि रेणुका शहाणेसोबत 'त्रिभंगा' या चित्रपटात झळकली होती. 

टॅग्स :मिथिला पालकरसेलिब्रिटी