Join us

मिथिलाच्या त्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा, फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 07:15 IST

आजच्या तरुणाईचं प्रतिनिधीत्व करणारी अभिनेत्री म्हणजे मिथीला पालकर. आनंदी चेहऱ्यानं घायाळ करणारी अभिनेत्री म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते.

आजच्या तरुणाईचं प्रतिनिधीत्व करणारी अभिनेत्री म्हणजे मिथीला पालकर. एक उत्स्फूर्त आणि कायमच आपल्या आनंदी चेहऱ्यानं घायाळ करणारी अभिनेत्री म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते. इतकेच नाही तर आपल्या अभिनयाची जादूही मिथीलाने दाखवून दिली आहे.

मुरांबा या आपल्या पहिल्यावहिल्या सिनेमात तिने दर्जेदार अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मिथिला पालकर हिने मराठी सिनेसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये कमी कालावधीत आपली ओळख निर्माण केली आहे.

तिने कारवां या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'माझा हनीमून'मध्येही तिच्या अभिनयाचे विशेष कौतूक झाले. गर्ल इन द सिटी' आणि 'लिटील थिंग्स' या वेबसिरीजमधील भूमिकांमुळे ‘वेब क्वीन’ म्हणून तिला ओळख मिळाली.  

मिथिलाने नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत मिथिलाने सफेद रंगाचा वनपीस घातला आहे. या फोटोत मिथिलाच्या हॉट अदा तिच्या फॅन्सना चांगल्याच भावल्या आहेत. आतापर्यंत या फोटोला 2 लाखांच्यावर लाईक्स मिळाले आहेत.

एक उत्तम अभिनेत्री असल्याचे सिद्ध करणारी मिथीला आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच सजग आहे. कोणत्या कार्यक्रमात कशी स्टाईल आणि फॅशन असावी हे ती उत्तमरित्या जाणते. विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते.  मिथीला कप साँगमुळे अल्पवधीतच साऱ्यांची लाडकी बनली होती. तिने वेबविश्वात अक्षरक्षा धुमाकूळ घातला होता. 

टॅग्स :मिथिला पालकर