Join us
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये नो मेकअप लूकनंतर या मराठी अभिनेत्रीचा हॉट फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 07:00 IST

आतापर्यंत 2 लाख 30 हजाराहुन अधिक लाईक्स आले आहेत.

मिथिला पालकरने इरफान खानसोबत 'कारवां' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमातील तिच्या भूमिकेचेही विशेष कौतुक झाले होते. तर मराठीत मुरांबा या चित्रपटातून रसिकांना चांगलीच भुरळ पाडली. मिथिला अभिनेता अभय देओलसोबत नेटफ्लिक्सवरील सिनेमा 'चॉपस्टिक'मध्ये झळकली होती.

मिथिला सोशल मीडियावर तिच्या हॉट अँड बोल्ड फोटोंची चर्चा असते.लॉकडाऊनमध्ये मिथिला तिचे विविध सोशल मीडियावर शेअर करत असते. कधी नो मेकअप लूकमधला तर कधी योगा करतानाचा. आता मिथिलाने तिचा हॉट फोटो इन्स्टावर शेअर केला आहे. या फोटोवर आतापर्यंत 2 लाख 30 हजाराहुन अधिक लाईक्स आले आहेत. 

मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत मिथिला पालकरने अल्पावधीतच आपले स्थान निर्माण केले आहे. आजच्या तरुणाईचं प्रतिनिधीत्व करणारी आणि एक उत्स्फूर्त तसेच कायमच आपल्या आनंदी चेहऱ्यानं घायाळ करणारी अभिनेत्री म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते. मिथीला कप साँगमुळे अल्पवधीतच साऱ्यांची लाडकी बनली होती. तिने वेबविश्वात अक्षरक्षः धुमाकूळ घातला होता. कपच्या तालावरील तिचे ‘हिची चाल तुरु तुरु...’ नेटिझन्ससह रसिकांनाही भावले होते.

टॅग्स :मिथिला पालकर