Join us

लंडनमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय 'ही' मराठी अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 16:18 IST

आजच्या तरुणाईचं प्रतिनिधीत्व करणारी अभिनेत्री म्हणून हिच्याकडे पाहिले जातं.

आजच्या तरुणाईचं प्रतिनिधीत्व करणारी अभिनेत्री म्हणून हिच्याकडे पाहिले जातं. एक उत्स्फूर्त आणि कायमच आपल्या आनंदी चेहऱ्यानं घायाळ करणारी अभिनेत्री म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते. इतकेच नाही तर आपल्या अभिनयाची जादूही मिथीला पारकरने दाखवून दिली आहे.

मिथीला सोशल मीडियावरही बरीच सक्रीय असते. बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर करत ती फॅन्सशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करते. सध्या मिथीला लंडनमध्ये आहे. लंडन आय जवळचा तिचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोला कर्टसी तिने अभिनेत्री सखी गोखलेला दिली आहे. फॅन्सनी या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

मुरांबा या आपल्या पहिल्यावहिल्या सिनेमात तिने दर्जेदार अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मिथिला पालकर हिने मराठी सिनेसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये कमी कालावधीत आपली ओळख निर्माण केली आहे. तिने कारवां या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'माझा हनीमून'मध्येही तिच्या अभिनयाचे विशेष कौतूक झाले.

गर्ल इन द सिटी' आणि 'लिटील थिंग्स' या वेबसिरीजमधील भूमिकांमुळे ‘वेब क्वीन’ म्हणून तिला ओळख मिळाली. इरफान खानसोबत 'कारवां' सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमातील तिच्या भूमिकेचेही विशेष कौतुक झाले होते. मिथिला अभिनेता अभय देओलसोबत नेटफ्लिक्सवरील सिनेमा 'चॉपस्टिक'मध्ये झळकली होती.   

टॅग्स :मिथिला पालकर