Join us
Daily Top 2Weekly Top 5

मिताली मयेकरचे बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफूल लूक, सोशल मीडियावरील फोटो घालतायत धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 11:28 IST

गेल्या काही दिवसांत तिने असेच हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळाले.

दिवसेंदिवस अभिनेत्री मिताली मयेकर तिच्या सिनेमांपेक्षा आपल्या बोल्ड अंदाजामुळे जास्त चर्चेत असते. सोशल मीडियावर मिताली  अॅक्टिव्ह असून नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते . तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते. सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील. गेल्या काही दिवसांत तिने असेच हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळाले.

‘उर्फी’ सिनेमातून मितालीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं त्यानंतर झी युवावरच्या ‘फ्रेशर्स’ मालिकेतही मितालीने काम केलं. तिचा याचवर्षी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत साखरपुडाही झाला आहे. 'गुलाबजाम', 'क्लासमेट' यांसारखे अनेक सिनेमा ‘अग्निहोत्र’, ‘प्रेम हे’ यांसारख्या मालिकेतून सिद्धार्थने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. त्या दोघांचे कपल त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असून त्यांच्या दोघांचे अनेक फोटो आपल्याला त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर पाहायला मिळतात.

सिद्धार्थ आणि मिताली लवकरच एका ऑस्ट्रेलियन सिनेमात झळकणार आहेत. हे दोघंही  सिनेमाच्या शूटिंगसाठी  ऑस्ट्रेलियाला गेले होते. तिथेही शूटिंगमधून वेळ काढत त्यांनी मस्त भटकंती केली त्यावेळचे प्रत्येक क्षण सिद्धार्थ आणि मिताली कॅमेऱ्यात कैद करत होते.

 

नेहमीप्रमाणे दोघांची केमिस्ट्री खूप छान दिसली . तसेच या सिनेमाविषयी  सिद्धार्थने  सांगितले होते की, ‘हा सिनेमा म्हणजे एक कौटुंबिक ड्रामा आहे. एक रोड ट्रीप हा विषय यात हाताळला गेला आहे. आलोक राव हा सिनेमा दिग्दर्शित करतोय. 

टॅग्स :मिताली मयेकर