Join us
Daily Top 2Weekly Top 5

मिताली मयेकर -सुयश टिळकचे 'हॅशटॅग प्रेम', जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2021 16:27 IST

‘हॅशटॅग प्रेम’ सिनेमाच्या माध्यमातून अशीच एक नवी कोरी प्रेमकहाणी रसिकांसमोर उलगडणार आहे.

‘हॅशटॅग प्रेम’ या आगामी मराठी सिनेमाच्या माध्यमातून अशीच एक नवी कोरी प्रेमकहाणी रसिकांसमोर उलगडणार आहे. शीर्षकावरूनच हा सिनेमा आजच्या काळातील असल्याची जाणीव करून देणारा ठरतो. आजच्या सोशल मीडियाच्या हॅशटॅगच्या जमान्यातील प्रेम प्रेक्षकांना या सिनेमात पहायला मिळणार आहे.

निर्माते अनिल गोविंद पाटील यांनी माऊली फिल्म प्रोडक्शनच्या बॅनरखाली बनवलेला हॅशटॅग चित्रपट वितरक समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांच्या पिकल एंटरटेनमेंटच्या सहकार्याने सिनेरसिकांसमोर प्रस्तुत केला जाणार आहे. निर्माते अनिल गोविंद पाटील यांनी ‘हॅशटॅग प्रेम’च्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. दिग्दर्शक राजेश जाधव यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा सिनेमा आजच्या पिढीचं प्रतिनिधीत्व करणारा असून, तरूणाईला मार्गदर्शक ठरणारा आहेच, परंतु एक सुज्ञ विचार देणाराही आहे. 

या सिनेमात प्रेक्षकांना एक नवे कोरे प्रेमी युगुल पहायला मिळणार आहे. ‘हॅशटॅग प्रेम’मध्ये मिताली मयेकर आणि सुयश टिळक मुख्य भूमिकेत असून, त्यांची अनोखी केमिस्ट्री या सिनेमाचे आकर्षण ठरणार आहे.

‘हॅशटॅग प्रेम’ची कथा-पटकथा निखिल कटारे यांनी लिहिली असून आघाडीचे संगीतकार प्रविण कुवर यांनी या सिनेमातील गीतांना सहजसुंदर संगीत दिले आहे.

नृत्यदिग्दर्शन आशिष पाटील यांनी केले असून कलादिग्दर्शन केशव ठाकूर यांचे आहे. सिनेमॅटोग्राफर राजा फडतरे यांच्या नजरेतून हा सिनेमा प्रेक्षकांना पहायला मिळणार असून महेश भारंबे यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी उत्तमरित्या सांभाळली आहे. ‘हॅशटॅग प्रेम’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :सुयश टिळकमिताली मयेकर