अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने (Siddharth Chandekar) काही दिवसांपूर्वीच ३४ वा वाढदिवस साजरा केला. सिद्धार्थच्या वाढदिवसाला त्याची बायको मिताली मयेकरने (Mitali Mayekar) खास सरप्राईज दिलं होतं. मितालीने सर्व मित्रपरिवाराला एकत्र नेत अलिबागला सिद्धार्थचा वाढदिवस साजरा केला. रोहित राऊत, जुईली, गायत्री दातार, क्षिती जोग, हेमंत ढोमे, हरीश दुधाडे, नचिकेत लेलेसह आणखी काही मित्रमंडळींसोबत त्यांनी धमाल केली. मितालीने वाढदिवसाचे फोटो नुकतेच शेअर केलेत. यात तिचाही ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे.
मिताली मयेकरने इन्स्टाग्रामवर सिद्धार्थच्या बर्थडे सेलिब्रेशनची झलख दाखवली आहे. एका लूकमध्ये तिने आणि सिद्धार्थने ट्वीनिंग केलं आहे. सिद्धार्थने लाल रंगाचा शर्ट घातला आहे. तर मितालीने त्याच रंगाचा क्युट शॉर्ट वनपीस घातला आहे. दोघांचा फोटो अगदीच गोड आला आहे. याशिवाय एका फोटोत मिताली निऑन रंगाच्या स्विमसूटमध्ये दिसतेय. स्वीमिंग पूलमध्ये दोघांचा कोझी फोटो तिने शेअर केला आहे. कधी सर्वजण लॉनमध्ये क्रिकेट खेळताना दिसतायेत तर कधी स्वीमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहेत. 'दुरून तू अजूनही १८ वर्षांचाच दिसतोस' असा खास मेसेज मितालीने केकवर लिहिला आहे.
"या वीकेंडमधून आम्ही अजून बाहेरच आलेलो नाही. बर्थडे बॉय तर एकदम खूश होता आणि आम्हीही. तिथे दोन दिवस झिरो नेटवर्क होतं पण आम्हाला आयुष्यभराचे साथी मिळाले.", असं कॅप्शन मितालीने या फोटोंना दिलं आहे.
सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली नुकतेच 'फसक्लास दाभाडे' सिनेमात दिसले. इतक्या वर्षात त्यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केलं. सिद्धार्थ आणि मितालीमध्ये ५ वर्षांचं अंतर आहे. त्यांच्या परदेश वारीचे फोटो नेहमी व्हायरल होत असतात.