Join us

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरची नेल्सन मंडेलांना अनोखी श्रद्धांजली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 19:07 IST

 मिस वर्ल्ड २०१७ मानुषी छिल्लर सध्या दक्षिण आफ्रिकेत आहे.

 

 मिस वर्ल्ड २०१७ मानुषी छिल्लर सध्या दक्षिण आफ्रिकेत आहे. वर्णद्वेषविरोधी लढ्याचे अग्रणी आणि दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष दिवंगत नेल्सन मंडेला यांच्या १०० वी जयंती समारोहात सहभागी होण्यासाठी मानुषी छिल्लर सध्या या देशाच्या भेटीवर गेली आहे.

१८ जुलै १९१८ रोजी जन्मलेल्या नेल्सन मंडेला यांचा १०० वी जयंती काल साजरी झाली. कालपासून सुरू झालेल्या या जयंती महोत्सवादरम्यान मानुषीने येथे जगातील पहिल्या १००टक्के ‘कम्पोस्टेबल सॅनिटरी पॅड युनिट’चे उद्घाटन केले.

दक्षिण आफ्रिकेतील सर्वसामान्य महिलांच्या आरोग्याच्यादृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम मानला जात आहे. यावेळी दक्षिण यावेळी मानुषी या युनिटमधील महिलांना विशेष प्रशिक्षण दिले. या युनिटमध्ये बनणारे सॅनिटरी पॅड हे ज्यूटपासून बनवलेले असतील. त्यामुळे हे सॅनिटरी पॅड पर्यावरणाच्यादृष्टीने अजिबात हानीकारक नसतील.

 वयाच्या ९५व्या वर्षी नेल्सन मंडेला यांचे निधन झाले. नेल्सन मंडेला यांनी कायम देशाला उच्च विचारसरणी राखण्याची शिकवण दिली. त्यांच्या या वर्णद्वेष आणि वर्णभेद विरोधी मोहिमेमुळे त्यांच्या विरोधातील नेत्यांनी त्यांना तुरुंगात डांबले होते. नेल्सन मंडेला यांना तब्बल २७ वर्षे तुरुंगवास सहन करावा लागला. 

 

टॅग्स :मानुषी छिल्लर