Join us
Daily Top 2Weekly Top 5

मिर्झापूर वेबसीरीज म्हणजे 'UP चा गेम ऑफ थ्रोन्स', कसा ते फॅन्सने ट्विटरवर सांगितलं समजावून....

By अमित इंगोले | Updated: October 30, 2020 11:28 IST

एकाने लिहिले की, मिर्झापूर २ बघताना कुणाला गेम ऑफ थ्रोन्स बघत असल्याचं जाणवलं की, हे फक्त मलाच जाणवलं?. चला बघुया काही फॅन्स कशाप्रकारे केली या दोन्ही लोकप्रिय वेबसीरीजची तुलना....

नुकताच मिर्झापूर वेबसीरीजचा दुसरा सीझन 'मिर्झापूर २' रिलीज झाला. तब्बल दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आता या सीरीजचे फॅन्स या वेबसीरीजची तुलना थेट 'गेम फॉफ थ्रोन्स' आणि 'गॅंग्स ऑफ वासेपुर'सोबत तुलना करू लागले आहेत. काही फॅन्सनी तर दोन्ही सीरीजच्या काही सीन्सचे फोटोही ट्विटरवर शेअर केले आहेत.

काही फॅन्सने तर ठोसपणे हे सांगितलं की, मिर्झापूर ही वेबसीरीज 'गेम ऑफ थ्रोन्स ऑफ उत्तरप्रदेश' आहे. एकाने लिहिले की, मिर्झापूर २ बघताना कुणाला गेम ऑफ थ्रोन्स बघत असल्याचं जाणवलं की, हे फक्त मलाच जाणवलं?. चला बघुया काही फॅन्स कशाप्रकारे केली या दोन्ही लोकप्रिय वेबसीरीजची तुलना....

मिर्झापूर वेबसीरीजचा पहिला सीझन रिलीज झाला होता तेव्हा प्रेक्षकांनी या वेबसीरीजची तुलना अनुराग कश्यपच्या गॅंग ऑफ वासेपुरसोबत केली होती. त्यावेळीही असेच काही तुलना करणारे ट्विट व्हायरल झाले होते. 

 

टॅग्स :मिर्झापूर वेबसीरिजगेम ऑफ थ्रोन्ससोशल मीडिया