Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mirzapur ३ मधून मुन्ना भैय्या गायब? अभिनेता दिव्येंदू शर्मानेच केला होता खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 15:16 IST

सीझन 2 नंतर मुन्ना भैय्या परत येणार की नाही असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तसंच मिर्झापूर म्हणजेच मुन्ना भैय्या असाच चाहत्यांचा समज आहे.

ओटीटी विश्वातील 'मिर्झापूर' (Mirzapur) या गाजलेल्या वेबसीरिजच्या तिसऱ्या भागाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. अॅमेझॉनने दोन दिवसांपूर्वीच 70 प्रोजेक्ट्सची घोषणा केली असून त्यात मिर्झापूर देखील आहे. कालीन भैय्या अजूनही जीवंत असून गुड्डू भैय्या सत्तेच्या खुर्चीवर बसला आहे. आता पुढे ही लढाई काय वळण घेणार हे तिसऱ्या भागात कळणारच आहे. पण या पार्टमधून दिव्येंदु शर्मा (Divyendu Sharma) म्हणजेच मुन्ना भैय्या नसणार. दुसऱ्या भागाच्या शेवटी गुड्डू भैय्या मुन्ना भैय्याला मारतो तर कालीन भैय्या मात्र वाचतात असं दाखवण्यात आलं होतं. पण मुन्ना भैय्या खरंच मेला का, आता तो सीरिजमध्ये नसणार का असे प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत.

मिर्झापूर 3 (Mirzapur 3) मध्ये गुड्डू आणि गोलू सिंहासनाच्या लढाईतील एका नवीन शत्रूचा सामना करणार आहेत. यामध्ये मुन्ना भैय्याचा कुठेही उल्लेख आलेला नाही. सिझन २ नंतर मुन्ना भैय्या परत येणार की नाही असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तसंच मिर्झापूर म्हणजेच मुन्ना भैय्या असाच चाहत्यांचा समज आहे. त्यामुळे दिव्येंदु शर्मा सीझन ३ मध्ये असणार की नाही हा प्रश्न याआधीच आला होता. तेव्हा दिव्येंदुने याचं उत्तर दिलं होतं.

२०२२ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत दिव्येंदु शर्मा म्हणाला, "मी आताच ते सांगू शकत नाही. काहीही बोललो तर मीच अडचणीत येईल पण मिर्झापूर 3 येणार हे नक्कीच सांगू शकतो. मी शोचा भाग असू दे किंवा नसू दे पण शो पाहताना तुम्हाला माझी आठवण येणार नाही असं तर होणार नाही. मी ऑफ स्क्रीन तुमच्या मनात आहे."

तेव्हा दिव्येंदुने भलेही गोंधळात पाडणारं उत्तर दिलं असेल तरी सध्याच्या अपडेटनुसार मिर्झापूर ३ मध्ये दिव्येंदु नसणार आहे. मात्र तरी वेबसीरिजमध्ये कोणताही ट्विस्ट अँड टर्न पाहायला मिळू शकतो हे नक्की.

टॅग्स :मिर्झापूर वेबसीरिजसेलिब्रिटीअ‍ॅमेझॉन