Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: भूल तो नहीं गए हमें? ; 'मिर्झापूर 3' चा फर्स्ट लूक आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 14:03 IST

Mirzapur 3: मिर्झापूर ३ ची पहिली झलक समोर आली असून या भागात प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी नवीन पाहायला मिळणार आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षक 'मिर्झापूर 3' ची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. मिर्झापूर (Mirzapur) आणि मिर्झापूर 2 हे दोन्ही पार्ट ओटीटीवर प्रचंड गाजले होते. त्यामुळे या सीरिजचा तिसरा पार्ट कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. यामध्येच आता या सीरिजविषयी मोठी अपडेट समोर आली आहे.

प्राइम व्हिडीओने मिर्झापूर 3 ची पहिली झलक प्रेक्षकांना दाखवली आहे. नुकताच मुंबईमध्ये #AreYouReady या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात प्राइम व्हिडीओने जवळपास ७० सिनेमा आणि सीरिजची घोषणा केली. यात मिर्झापूर 3 चादेखील समावेश आहे.मिर्झापूर 3 ची पहिली झलक आली समोर

नुकत्याच झालेल्या या कार्यक्रमामध्ये मिर्झापूर 3 ची झलक दाखवण्यात आली आहे. तसंच या वेबसीरिजचं पोस्टही रिलीज करण्यात आलं आहे. त्यामुळे हा फर्स्ट लूक पाहिल्यानंतर प्रेक्षकांमधील उत्सुकता आता आणखीनच वाढली आहे.

प्रदर्शित झालेल्या व्हिडीओमध्ये कालीन भैय्या (पंकज त्रिपाठी) एका शांत जागेवर उभा असून भूल तो नहीं गए हमें? असा प्रश्न विचारतो. त्यानंतर गुड्डू भैय्या आणि बीना एकमेकांचा हात पकडून उभे असल्याचं दिसून येतं. या सीरिजमध्ये श्वेता त्रिपाठी, विजय वर्मा, ईशा तलवार देखील झळकणार आहेत.

अली फजलने दिली होती हिंट

काही दिवसांपूर्वीच अली फजलने या सीरिजविषय़ीची एक हिंट दिली होती. त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. त्याने गुड्डू पंडितच्या लूकमधील त्याचा फोटो शेअर केला होता. तसंच सुरु झालं आहे..तुम्ही तयार आहात का? उद्या काही तरी खास येतंय. उद्या काही तरी खास होणार आहे, असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं होतं.

टॅग्स :मिर्झापूर वेबसीरिजपंकज त्रिपाठीसेलिब्रिटीवेबसीरिज