Join us

Mirzapur 2 Public Review: रिलीज होताच 'मिर्झापूर २' धमाका, प्रेक्षक म्हणाले - आतापर्यंतची बेस्ट सीरीज!

By अमित इंगोले | Updated: October 23, 2020 13:39 IST

२०१८ मध्ये आलेल्या 'मिर्झापूर' नंतर प्रेक्षकांना दुसऱ्या सीझनची उत्सुकता होती. आता लोकांचा रिव्ह्यू वाचून इतकंच म्हणता येईल की, इतके दिवस प्रतिक्षा करणं गोड ठरलं आहे.

पंकज त्रिपाठी आणि फजलची वेबसीरीज मिर्झापूर २ रिलीज झाली आहे. रिलीज झाल्याच्या काही तासातच सीरीजने असा काही धमाका केला की, सगळीकडे फक्त एकच चर्चा रंगली आहे. लोक सोशल मीडियातून ही आतापर्यंतची सर्वात बेस्ट वेबसीरीज असल्याचं सांगत आहेत. २०१८ मध्ये आलेल्या 'मिर्झापूर' नंतर प्रेक्षकांना दुसऱ्या सीझनची उत्सुकता होती. आता लोकांचा रिव्ह्यू वाचून इतकंच म्हणता येईल की, इतके दिवस प्रतिक्षा करणं गोड ठरलं आहे.

सोशल मीडियावर मिर्झापूरच्या सीझन २ ला जबरदस्त रिस्पॉन्स मिळत आहे. लोकांनी तर या वेबसीरीजला ऑल टाइम ब्लॉकबस्टर सांगितलं आहे. ठरलेल्या वेळेपेक्षा आधीच वेबसीरीज रिलीज केल्याने लोकांनी रातोरात सीझन २ चे सगळे एपिसोड पाहून संपवले. अशात आता ते सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत. सीरीजमधील सर्वच कलाकारांच्या कामांचं भरभरून कौतुक केलं जात आहे. असेही म्हटले जात आहे की, सीरीजमध्ये तो सगळा मसाला आहे जो पूर्ण १० एपिसोडपर्यंत तुम्हाला बांधून ठेवतो. (भौकाल! मिर्झापूर २ रिलीज होताच फॅन्सची उडाली झोप, पहिल्या दिवशीच मीम्सचा धुमाकूळ..)

ट्रेलरनंतर अंदाज लावला जात होता की, सीझन २ मध्ये कथेत अनेक ट्विस्ट  आणि टर्न्स बघायला मिळतील. पण प्रेक्षकांनुसार, यात अपेक्षेपेक्षा जास्त मनोरंजन आहे. एका यूजरने लिहिले की, पहिलाच एपिसोड फार शानदार होता. पुढील एपिसोडमध्ये काय होईल याची उत्सुकता वाढते. दुसऱ्या एक यूजरने लिहिले की, ही तर पहिल्या सीझनपेक्षाही जास्त चांगली आहे. फार इंटेन्स आहे. मजा आली. तर असेही अनेक फॅन्स आहेत जे म्हणाले की, ही आतापर्यंतची बेस्ट वेबसीरीज आहे. (Mirzapur 2 : अली फजल करणार होता मिर्झापूरच्या मुन्ना त्रिपाठीची भूमिका, जाणून घ्या आणखी काही इंटरेस्टींग गोष्टी)

दुसऱ्या सीझनमध्ये गुड्डू्या सूडावर जास्त भर देण्यात आला आहे. त्यामुळे फॅन्स अली फजलच्या कामाचं भरभरून कौतुक करत आहेत. तसेच यातील दमदार डायलॉगही सोशल मीडियावर ट्रेन्ड करत आहेत. अनेक यूजर्सनी तर तिसरा सीझन येणार असेही अंदाज बांधने सुरू केले आहे. 

मिर्झापूर २ ला मिळत असलेल्या जबरदस्त रिस्पॉन्स हे तर नक्की झालं की, मेकर्सनी पुन्हा एकदा आपली जादू चालवली आहे. रिव्हेंज ड्रामा असा समोर ठेवला आहे की, पंकज त्रिपाठी, अली फजल आणि श्वेता त्रिपाठी यांना आपलं टॅलेंट दाखवण्याची पुरेपूर संधी मिळाली आहे. जर या सीरीजने अनेक रेकॉर्ड तोडले तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. 

टॅग्स :मिर्झापूर वेबसीरिजअली फजलपंकज त्रिपाठीवेबसीरिजसोशल मीडिया