Join us

Mirzapur 2 Trailer : गुड्डू पंडीत बदला घेण्यासाठी सज्ज, मिर्झापूरवरही करणार राज्य...

By अमित इंगोले | Updated: October 6, 2020 14:10 IST

मिर्झापूरच्या दुसऱ्या सीजनचा म्हणजे 'मिर्झापूर २'चा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. ज्यात आधीच्या सीजनप्रमाणेच यातही सगळे कलाकार धांसू अंदाजात दिसत आहे.

आज जेव्हाही कुठे चांगल्या वेबसीरीजचा विषय निघतो त्यात 'मिर्झापूर'चं नाव आवर्जून घेतलं जातं. या सीरीज पहिला सीजन फारच सुपरडुपर हिट ठरला होता आणि प्रेक्षक याच्या दुसऱ्या सीजनची आतुरतेने वाट बघत होते. आता प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली आहे. मिर्झापूरच्या दुसऱ्या सीजनचा म्हणजे 'मिर्झापूर २'चा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. ज्यात आधीच्या सीजनप्रमाणेच यातही सगळे कलाकार धांसू अंदाजात दिसत आहे.

पहिल्या सीजनमध्ये दाखवण्यात आलं होतं की, कालीन भैयाचा मुलगा मुन्ना बदला घेण्यासाठी बबलू पंडीत आणि श्रिया पिळगांवकरच्या भूमिकेला मारतो. यावेळी गुड्डू पंडीत आणि गोलू कालीन भैयाला मारण्यासाठी परत आले आहेत. सोबतच काही नवीन भूमिकाही बघायला मिळणार आहेत.

'मिर्झापूर २'चं स्ट्रीमिंग २३ ऑक्टोबरपासून सुरू होईल. मुख्य भूमिकेत पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी, दिव्येंदु शर्मा, रसिका दुग्गल, लिलीपुट, कुलभूषण खरबंदा, विक्रांत मेसी आणि श्रिया पिळगांवकर बघायला मिळतील.

दरम्यान, आज ट्रेलर येणार हे या सीरीजच्या चाहत्यांना माहीत होते. त्यामुळे आधीच सोशल मीडियावर यासंबंधी मीम्स, जोक्सचा पाऊस सुरू झाला होता. आता ट्रेलर पाहून तर उत्सुकता अधिक ताणली गेली आहे. पण प्रेक्षकांनी आणखी काही दिवस वाट बघावी लागणार आहे. 

टॅग्स :मिर्झापूर वेबसीरिजवेबसीरिजपंकज त्रिपाठीअली फजल