सन 2015 मध्ये अभिनेता शाहिद कपूरने स्वत:पेक्षा 13 वर्षांनी लहान असलेल्या मीरा राजपूतसोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर शाहिद व मीरा यांना मीशा व झेन अशी दोन मुलेही झालीत. पण येत्या काळात शाहिद कपूर पुन्हा बोहल्यावर चढणार आहे. होय, शाहिद कपूर पुन्हा एकदा लग्न करणार आहे. खुद्द शाहिदची पत्नी मीरा हिनेच हा खुलासा केला. आश्चर्य वाटले ना, पण हे खरे आहे. आता शाहिद मीराला सोडून कुणासोबत लग्न करणार, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर शाहिदच्या या होणा-या पत्नीचे नाव आहे मीरा. होय, पत्नी मीरा राजपूत हिच्याचसोबत शाहिद दुस-यांदा लग्न करणार आहे. हे लग्न कधी होणार, कसे होणार, हे आम्हाला ठाऊक नाही. पण होणार हे मात्र नक्की.
शाहिद कपूर व मीरा राजपूत या दोघांचे अरेंज मॅरेज. ७ जुलै २०१५ ला रोजी शाहिद आणि मीराचे लग्न झाले होते. शाहिद व मीराचे लग्न ठरले आणि अचानक मीरा चर्चेत आली होती. म्हणजे अगदी लग्नाच्या आधीपासूनच मीडियात तिने स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले.