Join us

शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतने घेतला ‘अ‍ॅमेझॉन’चा क्लास, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 11:29 IST

अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह दिसते.   खासगी आयुष्यातले अनेक फोटो आणि व्हिडीओ ती सर्रास शेअर करते. सध्या मीरा एका पोस्टमुळे चर्चेत आहे.

ठळक मुद्देशाहिद कपूर व मीरा राजपूत या दोघांचे तसे अरेंज मॅरेज. ७ जुलै २०१५ ला रोजी शाहिद आणि मीराचे लग्न झाले होते.

अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह दिसते.   खासगी आयुष्यातले अनेक फोटो आणि व्हिडीओ ती सर्रास शेअर करते. सध्या मीरा एका पोस्टमुळे चर्चेत आहे. या पोस्टमध्ये मीराने एका ई-कॉमर्स वेबसाईटची चांगलीच शाळा घेतली आहे.त्याचे झाले असे की, मीराने अ‍ॅमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरून काही साहित्य ऑर्डर केले होते. हे पार्सल आले आणि ते उघडताच मीराचा संताप अनावर झाला. अ‍ॅमेझॉनने प्लास्टिक एअरबॅगनी भरलेल्या खोक्यात हे पार्सल पाठवले होते. यानंतर मीराने या पॅकिंगचे फोटो शेअर करत,अ‍ॅमेझॉनचा चांगलाच क्लास घेतला.

‘एका साध्या वस्तूसाठी इतक्या प्लास्टिक एअरबॅग्सनी भरलेले ओवरसाईज पॅकेज पाठवणे मुर्खपणा आहे. ही सामग्री याशिवायही डिलीवर केली जाऊ शकली असती. आपली छोटीशी चूकही पृथ्वीला धोकादायक ठरू शकते.

एकीकडे अ‍ॅमेझॉनने ओव्हरसाईज पॅकेजिंगचे नियम बनवले आहे आणि यासाठी दंडाची तरतूद करते. मात्र दुसरीकडे विकणाºयांवर याचा जराही परीणाम होत नाही. सेलर्सकडे लक्ष देणे ही अ‍ॅमेझॉनची जबाबदारी आहे’, असेही तिने सुनावले.

शाहिद कपूरमीरा राजपूत या दोघांचे तसे अरेंज मॅरेज. ७ जुलै २०१५ ला रोजी शाहिद आणि मीराचे लग्न झाले होते. शाहिद व मीराचे लग्न ठरले आणि अचानक मीरा चर्चेत आली होती. म्हणजे अगदी लग्नाच्या आधीपासूनच मीडियात तिने स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. आधी तर मीरा कोण, याबाबत लोकांना उत्सुकता होती. यानंतर तिची एक झलक पाहण्यासाठी लोक उत्सुक होते. लग्नानंतर मीरा दोन मुलांची आई बनली आहे.आई बनल्यानंतर घर आणि मुले हेच मीराचे जग बनून जाईल, असे वाटले. पण मीरा आपली पर्सनल आणि सोशल लाईफ अगदी वेगवेगळ्या पद्धतीने हँडल करताना दिसतेय.  

टॅग्स :मीरा राजपूतशाहिद कपूरअ‍ॅमेझॉन