Join us

किसिंग व्हिडिओनंतर फिटनेस फ्रिक मिलिंद सोमणचा नवा कारनामा, ऐकून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 20:08 IST

मिलिंद सोमणने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो पाहून सर्व चकीत झाले आहेत.

बॉलिवूड अभिनेता मिलिंद सोमण अभिनयाव्यतिरिक्त फिटनेसाठी ओळखला जातो. इतकंच नाही तर फिटनेससाठी तरूणांमध्ये जनजागृती करताना दिसतो. ५३ वर्षीय मिलिंद सोमण स्वतःला फिट ठेवण्यासाठी खूप मेहनत करत असतो. नुकताच त्याने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो पाहून सर्व चकीत झाले आहेत. 

मिलिंद सोमणने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत तो त्याच्या पाठीवर १२ किलो वजन ठेवून २ डिग्री सेल्सिअस थंड पाण्यात चालताना दिसतो आहे. हा फोटो शेअर करून लिहिलं की, आइसलँडमध्ये १० दिवसांपूर्वी डाइव्हच्या तयारीसाठी १२ किलो बॅगपॅकसोबत अंडर वॉटर रनिंग. योग्य तयारीसोबत सर्व काही शक्य आहे इथंपर्यंत की २ डिग्री सेल्सिअसमध्ये फ्री डाइव्हदेखील. आपले ध्येय समजा आणि प्राधान्य ठरवा. तुमचे उद्देश पूर्ण होईल.

 मिलिंद सोशल मीडियावर अंकितासोबतचे फोटो व व्हिडिओ शेअर करत असतो. नुकताच तो अंकिता सोबत लेहला फिरण्यासाठी गेला आहे. तिथला त्याने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात तो अंकितासोबत वेळ व्यतित करताना दिसतो आहे.

मिलिंद सोमणने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात मिलिंद व अंकिता एकमेकांना किस करताना दिसत आहे. या व्हिडिओत दोघांचं खूप चांगलं बॉण्डिंग पहायला मिळतं आहे. 

त्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर २०१९मध्ये प्रदर्शित झालेल्या फोर मोअर शॉट्स प्लीझ या वेबसीरिजमध्ये झळकला होता.

टॅग्स :मिलिंद सोमण