Join us
Daily Top 2Weekly Top 5

मिलिंद सोमन पत्नी अंकितासह पुन्हा एकदा गेला व्हॅकेशनवर, 'बाली'मध्ये करतायेत एन्जॉय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 11:56 IST

५२ वर्षाचा मिलिंद तर अंकिताचे वय २७ वर्षे. दोघांमध्ये २५ वर्षांचा फरक त्यामुळे यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याची नेटीझन्स जरा जास्तच उत्सुक असतात.

मिलिंद आणि अंकिता या दोघांचाही सोशल मीडियावर बोलबाला पाहायला मिळतो. त्यांचे विविध अंदाजातील फोटोंना सोशल मीडियावर तुफान पसंती मिळते. या कपलच्या प्रत्येक गोष्टीची अपडेट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते. आता पुन्हा एकदा मिलिंद पत्नी अंकितासह बाली येथे मस्त क्वॉलिटी टाईम एन्जॉय करतोय. खुद्द मिलिंदने या दोघांचे  बालीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

गेल्या आठवड्यापासून हे दोघेही लव्ह्बर्ड बाली येथील वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत तेथील संस्कृती विषयी जाणून घेण्याचाही प्रयत्न करत आहेत. तसेच  शेअर केलेले फोटोत  मिलिंद आणि अंकिताचा रोमँटिक अंदाज पहायला मिळतोय, त्यांच्यातील केमिस्ट्रीही पाहायला मिळत आहे. या फोटोत दोघेही भलतेच खूश असल्याचे पाहायला मिळत आहे. 

विशेष म्हणजे मिलिंद आणि अंकिता यांच्याविषयी नेटीझन्समध्ये जास्त उत्सुकता असते.  ५२ वर्षाचा मिलिंद तर अंकिताचे वय २७ वर्षे. दोघांमध्ये २५ वर्षांचा फरक त्यामुळे यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याची नेटीझन्स जरा जास्तच उत्सुक असतात.  अंकिता मूळची दिल्लीची रहिवाशी असून तिचे खरे नाव सुंकुस्मिता कंवर आहे. 

टॅग्स :मिलिंद सोमण