Join us
Daily Top 2Weekly Top 5

मिलिंद सोमण- अंकिताने असा साजरा केला लग्नाचा वाढदिवस, पाहा UNSEEN व्हिडीओ!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 11:46 IST

फिटनेस फ्रीक, मॉडेल आणि अ‍ॅक्टर मिलिंद सोमण याने गतवर्षी गर्लफ्रेन्ड अंकितासोबत लग्नगाठ बांधली. दोघांच्याही लग्नाला एक वर्ष पूर्ण झालेय.

ठळक मुद्देमिलिंद हा ५२ वर्षाचा तर अंकिताचे वय २७ वर्षे आहे. दोघांमध्ये २५ वर्षांचा फरक असूनही दोघेही रेशीमगाठीत अडकले होते. त्यामुळे या लग्नाची प्रचंड चर्चा झाली होती.

फिटनेस फ्रीक, मॉडेल आणि अ‍ॅक्टर मिलिंद सोमण याने गतवर्षी गर्लफ्रेन्ड अंकितासोबत लग्नगाठ बांधली. दोघांच्याही लग्नाला एक वर्ष पूर्ण झालेय. या खास प्रसंगी या कपलने आपल्या सोशल अकाऊंटवर लग्नाचा एक अनसीन व्हिडीओ शेअर केला आहे. सोबत रोमॅन्टिक कॅप्शन लिहित एकमेकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

‘मागचे वर्ष सुंदर होते. पण तुझ्याइतके सुंदर नाहीच. कायम आनंदी राहा, अंकिता,’ असे मिलिंदने लिहिले. तर अंकितानेही व्हिडीओ शेअर करत, मिलिंदवरच्या प्रेमाची कबुली दिली. ‘ गत वर्षभराचा काळ आनंदात गेला. एक असा जोडीदार, ज्याचे मी स्वप्न बघितले होते, तो तुझ्या रूपात मला भेटला. तुझे माझ्या आयुष्यात असणे माझा संसार आणखी सुंदर बनवते. प्रत्येक दिवशी तू मला घडवतोस...,’ असे अंकिताने लिहिले.

मिलिंद व अंकिताने शेअर केलेल्या व्हिडीओत दोघेही लग्नाच्या पारंपरिक विधी पूर्ण करताना दिसत आहेत.  केवळ इतकेच नाही मिलिंद व अंकिता दोघेही एकत्र डान्स करतानाही दिसत आहेत.मिलिंद हा ५२ वर्षाचा तर अंकिताचे वय २७ वर्षे आहे. दोघांमध्ये २५ वर्षांचा फरक असूनही दोघेही रेशीमगाठीत अडकले होते. त्यामुळे या लग्नाची प्रचंड चर्चा झाली होती. अंकिता ही मिलिंदची दुसरी पत्नी आहे. २००६ साली मिलिंदने फ्रेंच अभिनेत्री मेलिन जंपानोई हिच्याशी लग्न केले होते. वयाच्या पन्नाशीतही तरुणांना लाजवेल अशा जोमात असणारा मिलिंद वास्तविक  स्वत:ला फिट ठेवण्यासाठी नियमितपणे वर्कआउट करीत असतो. त्यामुळेच या वयातही तो कमालीचा फिट दिसतो. 

टॅग्स :मिलिंद सोमण