Join us

25 वर्षांनी लहान गर्लफ्रेन्डसोबत केले लग्न! आता मिळाली ‘बिग बॉस12’ची आॅफर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 09:49 IST

गत एप्रिल महिन्यात अभिनेता मिलिंद सोमनने स्वत:पेक्षा 25 वर्षांनी लहान अंकिता कुंवरसोबत लग्न केले आणि तो चर्चेत आला. केवळ मिलिंदचं नाही तर त्याच्यासोबतीने अंकिताही चर्चेत आली. 

गत एप्रिल महिन्यात अभिनेता मिलिंद सोमनने स्वत:पेक्षा 25 वर्षांनी लहान अंकिता कुंवरसोबत लग्न केले आणि तो चर्चेत आला. केवळ मिलिंदचं नाही तर त्याच्यासोबतीने अंकिताही चर्चेत आली. आठवडाभरापूर्वी मिलिंद व अंकिताने स्पेनमध्ये पुन्हा एकदा लग्न केले. होय, अंकिताचे म्हणे जंगलात वाहणाऱ्या धबधब्याच्या साक्षीने लग्न करण्याचे स्वप्न होते. मिलिंदने अंकिताचे हे स्वप्नही पूर्ण केले. यानंतर तर मिलिंद व अंकिता आणखीच चर्चेत आले. आता त्यांची ही वाढती लोकप्रीयता ‘कॅश’ तर व्हायलाच हवी. शेवटी ग्लॅमर इंडस्ट्रीत या लोकप्रीयतेलाच तर महत्त्व आहे. मिलिंद व अंकिताची हीच लोकप्रीयता लक्षात घेऊन या कपलला ‘बिग बॉस12’ची आॅफर मिळाली असल्याचे कळतेय. मेकर्सने या दोघांशीही या शोसंदर्भात संपर्क साधल्याची ताजी बातमी आहे. अर्थात मिलिंद व अंकिताने अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. शिवाय हे कपल ही आॅफर स्वीकारणार की नाही, हेही अद्याप कळलेले नाही. पण एक मात्र खरे की, या पॉवर कपलने ही आॅफर स्वीकारल्यास ‘बिग बॉस12’चा टीआरपी वाढण्यास मदतचं मिळेल. मिलिंद आणि  अंकिता दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये होते. आपले प्रेम त्यांनी कधीच लपवून ठेवले नाही. सोशल मीडियावर दोघांनी आपआपल्या प्रेमाची कबुली दिली आणि अखेर हे प्रेम लग्नापर्यंत पोहोचले. याचवर्षी २२ एप्रिलला मिलिंद व अंकिताने पारंपरिक हिंदू पद्धतीने विवाह केला होता.

‘बिग बॉस12’च्या या सीझनमध्ये यावेळी स्पर्धक जोड्यांच्या रूपात सहभागी होणार असल्याचे कळतेय. ब्रिटीश अ‍ॅडल्ट स्टार डेनी डी यालाही या शोची आॅफर मिळाल्याची बातमी आम्ही तुम्हाला कालचं दिली होती. त्याच्यासोबत अभिनेत्री व मॉडेल माहिका शर्मा एन्ट्री घेणार, असेही कळतेय. माहिका शर्मा डेनीसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत, असे मानले जाते. स्वत: माहिकाने अनेकदा याबाबतची हिंट दिली आहे.

टॅग्स :मिलिंद सोमण