बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता आणि चाहत्यांना विनोदाने हसवणारा राजपाल यादव आर्थिक संकटात सापडला आहे. ९ कोटींच्या चेक बाऊन्स प्रकरणात राजपाल यादवने तिहार जेल तुरुंगात आत्मसमर्पण केलं. २०१० पासून सुरू असलेल्या या खटल्यात त्याला कोर्टाने शिक्षा सुनावली. "माझ्याकडे द्यायला खरंच पैसे नाहीत", असं भावुक विधान राजपाल यादवने केलं होतं. त्यानंतर त्याच्या मदतीसाठी बॉलिवूड कलाकार धावून आले. सोनू सूद, गुरमीत चौधरी, सलमान खान यांच्यानंतर आता बॉलिवूड सिंगरने त्याला मदत करणार असल्याचं सांगितलं आहे.
बॉलिवूडचा लोकप्रिय सिंगर मिका सिंग राजपाल यादवच्या मदतीला धावून आला आहे. राजपाल यादवला मिका सिंग ११ लाख रुपयांची मदत करणार आहे. "राजपाल यादवजी या कठीण काळात मी तुमच्यासोबत आहे. मी तुम्हाला ११ लाख रुपयांची मदत करण्यासाठी तयार आहे. तुम्ही आमच्या चेहऱ्यावर अगणित हास्य आणलं. आणि आज तुमच्यासोबत उभं राहण्याची गरज आहे. मी आवाहन करतो की इंडस्ट्रीतील कलाकारांनी त्यांच्या परिने मदत करावी. शेवटी आपण एक कुटुंब आहोत", असं मिका सिंगने म्हटलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
राजपाल यादवने अता पता लापता या सिनेमासाठी २०१० साली काही पैसे घेतले होते. १२ कोटींचं बजेट असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. राजपाल यादवने दिलेला ९ कोटींचा चेक बाऊन्स झाला होता. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर कोर्टाने त्याला नोटीस पाठवली होती. अखेर काही दिवसांपूर्वी राजपाल यादव तिहार जेलमध्ये पोलिसांना शरण गेला. अभिनेत्याची मदत करण्यासाठी बॉलिवूडमधील काही कलाकार पुढे सरसावले आहेत.
Web Summary : Rajpal Yadav faces financial struggles after a check bounce case. Singer Mika Singh pledged ₹11 lakh to help Yadav, urging industry support. Sonu Sood and Salman Khan also stepped forward to assist the actor during this difficult time.
Web Summary : चेक बाउंस मामले में राजपाल यादव की आर्थिक स्थिति ख़राब होने के बाद, गायक मीका सिंह ने 11 लाख रुपये की मदद की पेशकश की और इंडस्ट्री से समर्थन करने का आग्रह किया। सोनू सूद और सलमान खान ने भी अभिनेता की मदद की।