Join us

#MeToo: कैलाश खेर चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होता, फोटो जर्नलिस्टचा आरोप!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 10:04 IST

एका महिलेने विकास बहलवर गंभीर आरोप केल्यानंतर बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना राणौत हिनेही या महिलेची पाठराखण करत, विकास बहलवर गंभीर आरोप केले आहेत. आता पुढचा क्रमांक गायक कैलाश खेर याचा आहे.

तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर वादानंतर कदाचित बॉलिवूडमध्येही ‘#MeToo’ मोहिम सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांत अनेक महिलांनी त्यांच्यासोबतच्या लैंगिक शोषणाच्या, गैरवर्तनाच्या घटना शेअर करणे सुरू केले आहे. यातला ताजा अध्याय म्हणजे, दिग्दर्शक विकास बहल. टीमच्या एका महिलेने विकास बहलवर गंभीर आरोप केल्यानंतर बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना राणौत हिनेही या महिलेची पाठराखण करत, विकास बहलवर गंभीर आरोप केले आहेत. आता पुढचा क्रमांक गायक कैलाश खेर याचा आहे. होय, एका महिला फोटो जर्नालिस्टने कैलाश खेरवर अशाच प्रकारचे गंभीर आरोप केले आहेत. आपल्या अन्य एका महिला साथीदारासोबत ही महिला फोटोग्राफर कैलाश खेरची मुलाखत घ्यायला गेली होती, तेव्हाची ही घटना असल्याचा दावा केला गेला आहे. आपल्या या वाईट अनुभवाबद्दल या महिला फोटोग्राफरने ट्विट केले आहे.

‘कैलाश खेर आम्ही दोघींच्यामध्ये बसला होता आणि मुलाखत देताना सतत त्याचा हात आमच्या मांडीवर होता. कैलाशच्या मुलाखतीत या घटनेचाही उल्लेख कर, असे मी माझ्या जर्नलिस्ट मैत्रिणीला म्हटले होते. पण वृत्तपत्र या अँगलची बातमी छापणार नाही, असे तिचे म्हणणे होते,’ असे या पीडित महिला फोटो जर्नलिस्टने आपल्या ट्विटमध्ये ्म्हटले आहे. कैलाश खेरशिवाय या फोटो जर्नलिस्टने मॉडल जुल्फी सैय्यद याच्यावरही काहीसे असेच आरोप केले आहे, क्रूज लाईनरवर मी माझ्या काही पत्रकार मित्रांसोबत गेले होते, यावेळी मी माझा फोन चार्जिंगला लावायला जुल्फीच्या रूममध्ये गेले असता, त्याने मला बळजबरीने किस करणे सुरू केले. याची तक्रार करायला हवी, असे मी सोबतच्या जर्नलिस्टला म्हटले. पण तुझे हे आरोप कुणीच छापणार नाही, असे मला सांगण्यात आले. अर्थात दुसऱ्या दिवशी जुल्फीने झालेल्या कृत्यासाठी माझी माफी मागितली, असे तिने तिच्या ट्विटमध्ये लिहिले आहे.या महिला फोटो जर्नलिस्टचे ट्विट तुम्ही वर वाचू शकता.

टॅग्स :कैलाश खेर