‘मीटू’ मोहिमेअंतर्गत लैंगिक गैरवर्तनाचे आरोप झेलणारा दिग्दर्शक साजिद खान याच्यावर आणखी एका अभिनेत्रीने आरोप ठेवला आहे. होय, जॉनी गद्दार या चित्रपटाची अभिनेत्री प्रियंका बोस हिने साजिदवर अश्लिल चाळे केल्याचा आरोप ठेवला आहे.साजिदने मला एका चित्रपटाच्या आॅडिशनसाठी घरी बोलवले होते. बिकनीत आॅडिशन द्यावे लागेल, असे साजिदच्या मॅनेजरचा मॅसेज मला मिळाला होता. आॅडिशनच्या ठिकाणी पोहोचल्यावर मी बिकनी घातली. काहीच वेळात साजिद तिथे आला आणि सोफ्यावर बसला. यानंतर माझ्यासमोर आपली पँट खाली करून त्याने अश्लिल चाळे सुरू केलेत. तुला पाहून मीच उत्तेजित होत नाही, मग प्रेक्षक कसे होतील, असे तो मला म्हणाला. त्याचे ते रूप माझ्यासाठी धक्कादायक होते. मी इतकी घाबरले होते मी रडू लागले आणि रडत रडतचं घरी परतले, असे प्रियंकाने म्हटले आहे.
#MeToo: अन् तो माझ्यासमोर अश्लिल चाळे करू लागला...! अभिनेत्री प्रियंका बोसचा साजिद खानवर आरोप!!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 14:58 IST