Join us
Daily Top 2Weekly Top 5

MeToo : आलोकनाथ प्रकरणात २० वर्षानंतर होणार विनता नंदा यांची मेडिकल टेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 13:30 IST

बॉलिवूडचे ‘संस्कारी बाबू’आलोकनाथ यांच्या विरोधात  विनता नंदा यांनी ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आता घटनेच्या २० वर्षांनंतर पोलिसांनी विनता यांना मेडिकल टेस्टसाठी बोलवले आहे. 

ठळक मुद्देपोलिसांसमोर आलोकनाथचे खरे रुप समोर आणण्यासाठी मी माझी शारीरिक चाचणी करेल, असे विनता नंदा यांनी म्हटले आहे.

मीटू मोहिमेअंतर्गत बलात्काराच्या आरोपात फसलेले अभिनेते आलोक नाथ यांच्याविरोधात अलीकडेच गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यावर लेखिका- निर्माता विनता नंदा यांच्यांवर बलात्कार केल्याचा आरोप  आहे. बॉलिवूडचे ‘संस्कारी बाबू’आलोकनाथ यांच्या विरोधात  विनता नंदा यांनी ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आता घटनेच्या २० वर्षांनंतर पोलिसांनी विनता यांना मेडिकल टेस्टसाठी बोलवले आहे.   माध्यमांशी बोलताना विनता नंदा यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तथापि पोलिसांसमोर आलोकनाथचे खरे रुप समोर आणण्यासाठी मी माझी शारीरिक चाचणी करेल, असे विनता नंदा यांनी म्हटले आहे.आलोकनाथ यांच्याविरोधातील तक्रार दाखल करूनही या प्रकरणात फारसे काही घडले नाही. तक्रार दाखल केल्यानंतर ३ आठवड्यानंतर पोलिसांनी मला बोलवले आणि आता आम्ही एफआयआर दाखल करणार. एफआयआर दाखल केल्यानंतर आलोकनाथ यांना अटक केली जायला हवी किंवा त्यांची चौकशी व्हायला हवी होती. पण आता माझीच चौकशी होत आहे. मीच माझे आरोप सिद्ध करावे, याची जबाबदारी माझ्यावरचं येऊन पडलीय. आता मला वैद्यकीय चाचणीसाठी बोलवण्यात आले आहे. तेही २० वर्षांनंतर. मला ही चाचणी करावीच लागेल. तेव्हास केस पुढे जाईल, असे पोलिस म्हणत आहेत, असे विनता यांनी माध्यमाशी बोलताना म्हटले आहे.  विनता नंदा यांनी मीटू मोहिमेअंतर्गत आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी पोस्ट लिहिली होती. एका पार्टीनंतर मी एकटी घरी जात होते. त्यांनी मला लिफ्ट देण्याची आॅफर दिली. मी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि कारमध्ये बसले. त्यानंतरचे मला अंधूक आठवते. मला जेव्हा जाग आली तेव्हा मला वेदना होत होत्या. मी बेडवरुन उठू शकले नाही. याबद्दल मी माझ्या मित्रांना सांगितले, परंतु सर्वांनी या घटनेला कायमचे विसरुन जाण्याचा सल्ला दिला, असे नंदा यांनी म्हटले होते.  

टॅग्स :आलोकनाथमीटू