Join us
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा एका जबरा फॅनने आयुषमान खुराणाला भेटण्यासाठी केला हा कारनामा, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 10:53 IST

आयुषमान खुराणाचे इतकेच नाही तर त्याचे प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. त्याचे फॅन तर त्याची एक झलक पाहण्यासाठी काहीही करू शकतात. असाच काहीसा प्रकार सध्या आयुषमानबरोबर घडल्याचे पाहायला मिळाले.

आयुषमान सध्या करिअरच्या यशाच्या शिखरावर आहे. बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेता म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते. अंधाधुनमधील अभिनयासाठी त्याला  सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आला. आजतकच्या रिपोर्टनुसार राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आयुषमाने त्याच्या मानधनात वाढ केली आहे. रिपोर्टनुसार आयुषमान एका जाहिरातीसाठी 3.5 कोटींची रक्कम आकारतो आहे.  इतकेच नाही तर त्याचे प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. त्याचे फॅन तर त्याची एक झलक पाहण्यासाठी काहीही करू शकतात. असाच काहीसा प्रकार सध्या आयुषमानबरोबर घडल्याचे पाहायला मिळाले. 

आयुषमान खुरानाने त्याच्या घरी पार्टी ठेवली होती. सेलिब्रेटींच्या घोळक्यात एका व्यक्तीने मात्र सा-यांचे लक्ष वेधून घेतले होते.  फक्त आयुषमानला भेटता यावे म्हणून त्याने चक्क स्त्रीवेषात सा-यांच्या नजरा चुकवत  पार्टीमध्ये घुसला. जेव्हा आयुषमानला त्या व्यक्तीने सगळा खटाटोप त्याला भेटण्यासाठी केला आहे. हे समजले त्यावेळी त्याने कौतुकाने त्या फॅनसोबत फोटो काढला. चाहत्यासोबत वेळ घालवत आपला आनंद साजरा केला. खुद्द आयुषमानने घडलेला सगळ्या प्रकाराबाबत माहिती देत या चाहत्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

तसेच लवकरच आयुषमान एक वेगळ्या भूमिकेतून रसिकांच्या भेटीला येणार आहे. आयुषमान खुराणा सध्या त्याच्या ड्रीम गर्ल या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या ट्रेलरला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. या ट्रेलरमध्ये आयुषमानचे एक वेगळेच रूप पाहायला मिळत आहे. राधे राधे या गाण्यावर थिरकल्यानंतर आता तो ढगाला लागली कळ... या गाण्यावर डान्स करताना दिसणार आहे.  ड्रीम गर्ल या गाण्यासाठी खास ढगाला लागली कळ या गाण्याचा रिमिक्स बनवण्यात आला आहे आणि या गाण्यावर आयुषमान आणि नुसरत थिरकताना दिसणार आहे. विशेष म्हणजे या गाण्यात प्रेक्षकांना रितेश देशमुखला देखील पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :आयुषमान खुराणा