Join us

या मराठी अभिनेत्रीच्या नव्या फोटोशूटनं सर्वांना केलं घायाळ, पहा तिचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 08:00 IST

मराठी चित्रपटसृष्टीतील ही अभिनेत्री आहे उत्तम डान्सर

छोट्या पडद्यावरील मालिका 'तुझं माझं ब्रेकअप'मधून मेनका नामक ग्रे शेड भूमिका साकारून घराघरात पोहचलेली अभिनेत्री व नृत्यांगना मीरा जोशी सोशल मीडियावरील फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिच्या नव्या फोटोने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.मीरा जोशी सोशल मीडियावर सक्रीय असून ती नेहमी ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. नुकताच तिने निळ्या रंगाच्या आऊटफिटमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती खूपच सुंदर दिसते आहे.

मीरा फक्त मराठी वाहिनीवरील स्पेशल पोलीस फोर्स नामक मालिकेत पहायला मिळाली. यात ती एका सहायक पोलीस अधिकारीची भूमिका साकारताना दिसणार आहे. तिच्यासोबत अभिनेता संजय बोरकरही पोलिसाच्या भूमिकेत पहायला मिळाला होता. पहिल्यांदाच मीराने पोलिसाची भूमिका साकारली आहे.

याशिवाय मीरा 'वृत्ती' नामक मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती अंजलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण उसरणी येथे पार पडले आहे. या चित्रपटाबाबत मीराने सांगितले की, ''वृत्ती' चित्रपटात मी अंजली नामक प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यात माझ्यासोबत अभिनेता अनुराग वरळीकर दिसणार आहे.'

'वृत्ती' चित्रपटाची कथा एका गावात दोन दिवसात घडणाऱ्या गोष्टींवर आधारीत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एस. अश्विन यांनी केले आहे. या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

टॅग्स :मीरा जोशी