Join us
Daily Top 2Weekly Top 5

चॅलेंज MeAt20 : विशीत कसे दिसायचे तुमचे आवडते मराठी स्टार्स, पाहून व्हाल थक्क!! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 15:26 IST

# MeAt20 : यांना ओळखता?

कोरोना संकट आणि लॉकडाऊन यामुळे अख्खा देश ठप्प आहे. लोक आपआपल्या घरात कैद आहेत. बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीचे कलाकारही याला अपवाद नाहीत. पण हो, चाहत्यांचे मनोरंजन करण्याचे प्रयत्न कलाकारांनी सोडलेले नाहीत.  सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळे सिने कलाकार चाहत्यांच्या संपर्कात आहेत. या ना त्या मार्गाने चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत.  MeAt20 हे चॅलेंज याचाच एक भाग म्हणायचे.होय, सध्या सोशल मीडियावर MeAt20 हे चॅलेंज ट्रेंडमध्ये आहे. म्हणजेच काय तर विशीतील फोटो शेअर करण्याचे चॅलेंज. आता या चॅलेंजला प्रतिसाद देत मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी आपले विशीतील फोटो शेअर केले आहेत. सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, स्वप्नील जोशी अशा अनेक कलाकारांनी या चॅलेंजअंतर्गत विशीतील फोटो शेअर केले आहे. केवळ इतकेच नाही तर या फोटोसोबत अनेकानी अनेक स्मृतीही जागवल्या आहेत. तेव्हा बघू तर...

सुबोध भावे

स्वप्नील जोशी

'नटरंग' फेम सोनाली कुलकर्णी

सिद्धार्थ जाधव

सोनाली कुलकर्णी

दिग्दर्शक रवी जाधव 

 हेमांगी कवी 

केदार शिंदे

टॅग्स :स्वप्निल जोशीसुबोध भावे