छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका माझ्या नवऱ्याची बायको (Mazya Navryachi Bayko)ने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी आजही या मालिकेतील सर्वच पात्रे प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहेत. या मालिकेत मायाची भूमिका अभिनेत्री रूचिरा जाधव (Ruchira Jadhav) हिने साकारली होती. रूचिराने वेबसीरिज आणि मालिकांमधून रसिकांच्या मनात घर केले आहे. नुकतेच रूचिराच्या सख्ख्या बहिणीचा विवाह सोहळा संपन्न झाला. तिची बहिणदेखील तिच्यासारखी दिसायला सुंदर आहे.
ऋतुजा जाधव ही रुचिरा जाधवची सख्खी बहीण आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच ३ जानेवारी रोजी ऋतुजा आणि अंकित ढगे यांचा साखरपुडा पार पडला होता. साखरपुडा निमित्त मराठी कलाकारांनी या दोघांनाही भरभरून शुभेच्छा दिल्या होत्या. साखरपुड्यानंतर डिसेंबर महिन्यात हे दोघेही विवाहबद्ध झाले आहेत. अंकित ढगे शेफ आणि एक सोशल वर्कर आहे. तो मुंबईत स्थायिक आहे.