Join us
Daily Top 2Weekly Top 5

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील या कलाकाराचे झाले निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 16:40 IST

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील एका कलाकाराचे निधन झाल्याचे नुकतेच समोर आले आहे.

लॉकडाउननंतर अनलॉक केल्यानंतर नवीन नियमांवलीसह मालिकांच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे. माझ्या नवऱ्याची बायको मालिकेच्या शूटिंगला नुकतीच सुरूवात झाली आहे. त्यामुळे चाहत्यांना आता या मालिकाचे पुढील भाग पाहता येत आहेत. मालिकांमधून सोशल डिस्टसिंग आणि सेट सॅनिटायझेशनलाही प्रामुख्याने प्राधान्य दिले जात आहे. असे असले तरी बऱ्याचशा कलाकारांना मालिकेतून वगळण्यात आलेले पाहायला मिळते आहे. त्यात आता माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील एका कलाकाराचे निधन झाल्याचे नुकतेच समोर आले आहे.

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील अभिनेता विजय वीर यांचे निधन झाल्याचे समजते आहे. विजय वीर हे एक सहकलाकार म्हणून परिचित आहेत. त्यांचे २० जुलै रोजी रात्री ८.३० च्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रुग्णालयातच निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने मालिकेतील इतर कलाकारांनीही एक चांगला सहकलाकार आणि एक चांगला मित्र गमावला असल्याची खंत व्यक्त केली आहे.

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत विजय वीर यांनी गुलमोहर सोसायटीच्या सिक्युरिटीची छोटीशी भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे गेल्या कित्येक दिवसांपासून ते मालिकेशी आणि त्यातील कलाकारांशी जोडले गेले होते. इतर सह कलाकारांसोबत एक भावनिक नाते जोडले गेल्याने त्यांच्या निधनाच्या बातमीने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून मालिकेच्या कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. या मालिकेव्यतिरिक्त विजय वीर यांनी नऱ्या (२०१७), माधव अशा काही मराठी हिंदी चित्रपटातून काम केले आहे.

टॅग्स :माझ्या नवऱ्याची बायको