Join us
Daily Top 2Weekly Top 5

'माझिया प्रियाला प्रीत कळेना' फेम मृणाल दुसानिसचं लेकीसोबत बर्थडे सेलिब्रेशन, शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 12:57 IST

Mrunal Dusanis : मृणाल दुसानिस हिने इंस्टाग्रामवर वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती लेक नुर्वी आणि पतीसोबत दिसते आहे.

'माझिया प्रियाला प्रीत कळेना' मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) बऱ्याच मोठ्या कालावधीपासून छोट्या पडद्यावरुन गायब आहे. सध्या ती अमेरिकेत राहत असून घर संसारात रमली आहे. तिला एक मुलगी देखील असून जिचे नाव नुर्वी आहे. बऱ्याचदा ती कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असते आणि सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असते. २० जूनला मृणालने ३५वा वाढदिवस साजरा केला. तिच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. दरम्यान आता तिने वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आभार मानले आहेत.

मृणाल दुसानिस हिने इंस्टाग्रामवर वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती लेक नुर्वी आणि पतीसोबत दिसते आहे. तिने हे फोटो शेअर करत लिहिले की, तुम्हा सर्वांचे, मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असे तोंडाला पाणी आणणारे चीजकेक बनवल्याबद्दल नीरजचे आभार. या फोटोवर देखील लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. अभिनेत्री सुकन्या मोने यांनी कमेंटमध्ये लिहिले की, कसेल गोड दिसताय तिघेही. 

मृणाल दुसानिस गेल्या तीन वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्यास आहे. पती नीरज मोरे आणि मुलगी नुर्वीसह आनंदात आहे. चिमुकल्या नुर्वीचे एक व्हिडिओ आणि फोटो मृणालने शेअर करत असते.. मृणालच्या या फोटोंना सोशल मीडियावर पसंती मिळत आहे. मृणाल दुसानिसने २०२० पर्यंत अभिनय क्षेत्रात काम केले. मृणाल 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकेत शेवटची दिसली. यातील तिची आणि शशांक केतकरची जोडी प्रेक्षकांनाही आवडली. 

२०१६ मध्ये मृणालने नीरज मोरेशी बांधली लग्नगाठ

२०१६ मध्ये मृणालने नीरज मोरेशी लग्नगाठ बांधली. नीरज मोरे हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. कामानिमित्त तो आधीपासूनच अमेरिकेत असतो. त्यामुळे मृणाललाही तिकडेच स्थायिक व्हावे लागले. सुखाच्या सरींनी मालिकेवेळी ती भारतात आणि नीरज अमेरिकेतच होता. मालिका संपताच ती अमेरिकेत गेली. मृणाल आता पुन्हा अभिनय क्षेत्रात परतणार का याबद्दल तिने अजून काहीच सांगितलेले नाही. 

 

टॅग्स :मृणाल दुसानीस