Join us
Daily Top 2Weekly Top 5

'गुलाबी साडी' गाण्यावर थिरकली मायरा वायकुळ, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 12:14 IST

मायराचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता मायराने 'गुलाबी साडी' गाण्यावर डान्स केला आहे.

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतून घराघरात पोहोचलेली बालकलाकार म्हणजे मायरा वायकुळ. निरागस अभिनयाने मायराने सगळ्यांची मनं जिंकून घेतली. परी ही भूमिका साकारून मायराने प्रेक्षकांना लळा लावला होता. त्यामुळेच मालिका संपल्यानंतरही प्रेक्षक तिच्यावर प्रेम करतात. मायराचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता मायराने 'गुलाबी साडी' गाण्यावर डान्स केला आहे. 

सध्या सोशल मीडियावर 'गुलाबी साडी' हे गाणं ट्रेंडिंग आहे. या गाण्यावरील अनेक रील व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अनेक सेलिब्रिटींनाही या गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरता आलेला नाही. माधुरी दीक्षितपासून ते अदा शर्मापर्यंत अनेक सेलिब्रिटी या गाण्यावर थिरकताना दिसले. मराठी सेलिब्रिटींनीही 'गुलाबी साडी' गाण्यावर रील बनवले आहेत. आता मायराच्या डान्सची चर्चा होताना दिसत आहे. मायराने 'गुलाबी साडी' गाण्यावर बनवलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

मायरा ट्रेंडिंग गाण्यावरील व्हिडिओ बनवताना दिसून येते. 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतून प्रसिद्धी मिळवलेल्या मायराचा चाहता वर्गही मोठा आहे. सध्या ती कलर्स वाहिनीवरील 'नीरजा' या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.  

टॅग्स :मायरा वैकुलटिव्ही कलाकार