Join us  

OMG!! लग्नानंतर रसिका सुनील परदेशात स्थायिक होणार? वाचा खरं काय आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2021 10:21 AM

‘माझ्या नवऱ्याची बायको’ (Mazhya Navryachi Bayko) या मालिकेत शनायाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रसिका सुनील ( Rasika Sunil) नुकतीच लग्नबेडीत अडकली.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ (Mazhya Navryachi Bayko) या मालिकेत शनायाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रसिका सुनील ( Rasika Sunil) नुकतीच लग्नबेडीत अडकली. बॉयफ्रेन्ड आदित्य बिलागीशी (Aditya Bilagi) तिने लग्नगाठ बांधली. गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर गेल्या 18 ऑक्टोबरला हा विवाह सोहळा पार पडला. या लग्नाचे अनेक फोटो तुम्ही पाहिले असतील. लग्नानंतर रसिकाने औरंगाबादेत लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी केली. पण याचदरम्यान, रसिका लग्नानंतर परदेशात स्थायिक होणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्यात. आता सर्वांची लाडकी रसिका परदेशात राहायला जाणार म्हटल्यानंतर चाहत्यांची निराशा होणं स्वाभाविक आहे. तुम्हीही रसिकाचे चाहते असाल आणि या बातमीने काहीसे हिरमुसले असाल तर जरा थांबा... होय, कारण लग्नानंतर परदेशात स्थायिक होण्याचा रसिकाचा सध्या तरी कुठलाही विचार नाहीये.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत रसिकाने याबद्दल माहिती दिली. ती म्हणाली, ‘लग्न अगदी माझ्या मनासारखं पार पडलं. समुद्रकिनारी अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न करण्याची माझी इच्छा होती. आम्हीच नाही तर आमच्या लग्नात येणाºया पाहुण्यांनी सुद्धा दैनंदिन ताण विसरून लग्न एन्जॉय करावं, हा यामागचा हेतू होता. तो हेतू सफल झाला. आम्ही अगदी पाय दुखेपर्यंत नाचलो. आदीच्या काकांनी तर आमचं एकत्र नाचतानाचं अप्रतिम असं शिल्पदेखील बनवलं.’

 लग्नानंतर तू नवऱ्यासोबत परदेशात राहायला जाणार, अशी चर्चा ऐकायला येतेय, असं विचारलं असता, रसिकाने सध्या तरी असा काहीही विचार नसल्याचं सांगितलं. ती म्हणाली,‘ आमचं करिअर आमच्यासाठभ महत्त्वाचं आहे. आमचं आमच्या करिअरवर खूप प्रेम आहे. त्यामुळे मी इथेच माझं काम करत राहीन आणि आदित्य लॉस एंजिलिसमध्ये त्याचं काम करेल. दोन वेगवेगळ्या देशात राहूनही आम्ही सुखात राहू, हा विश्वास आहे. हे लॉन्ग डिस्टंट रिलेशनशिप असलं तरी आम्हाला चिंता नाही. आम्ही सर्व गोष्टी सांभाळून घेऊ. रसिका दोन वर्षांपूर्वी ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका सोडून   लॉस एंजिलिसला पुढंच शिक्षण घेण्यासाठी गेली होती. तिथे तिची ओळख आदित्यशी झाली. मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. आता आदित्य व रसिका पती-पत्नी आहेत. आदित्य बिलागीच्या इन्स्टाग्रामच्या पोस्टनुसार तो इंजिनिअर, डान्सर आणि कोरिओग्राफर आहे आणि तो लॉस अँजेलिसमध्ये राहातो. 

टॅग्स :रसिका सुनिल