माणूस कोणत्याही मोठ्या संकटात सापडला, तरी त्याचे ज्ञानच त्याला त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करू शकते. ज्ञान तुम्हांला कधीही उपयोगी पडू शकते आणि हीच तुमची खरी ताकद आहे. 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात याच ज्ञानाच्या साथीने स्पर्धक एक करोड रुपये जिंकू शकतात. या आठवड्यात मुंबईची मयूरी वावदाने हॉट सीटवर खेळायला आली आहे.
{{#allowed}} {{#config.logo.enabled}}
{{/config.logo.enabled}}
{{/allowed}}मयूरी एमबीबीएसची विद्यार्थिनी आहे. मयूरीच्या आईचं स्वप्न होत हॉट सीटवर खेळायला यायचं, पण त्यांना ती संधी मिळाली नाही. हॉट सीटवर बसण्याची आणि कुटुंबावरचं कर्ज फेडण्याची संधी आता मयूरीला मिळाली आहे.
सचिन खेडेकर हे उत्तम संचालक असून हॉट सीटवर असलेल्या सर्व स्पर्धकांना सांभाळून घेतात आणि त्यांना बोलतेही करतात. मयूरीला तिच्या स्वप्नाविषयी विचारले असता कुटुंबावर असलेले कर्ज फेडता यावे, असे ती म्हणाली. आपल्या ज्ञानाच्या जोरावर इथपर्यंत पोचलेली मयूरी तिच्या कुटुंबाला या खेळामुळे कर्जमुक्त करेल.
'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन खेडेकर करत आहेत. मराठी घराघरांत सगळ्यांना सचिन खेडेकर परिचित आहेत. आपल्या देहबोलीमुळे आणि आवाजामुळे सचिन खेडेकर हे प्रेक्षकांचे लाडके अभिनेते आहेत. या कार्यक्रमात स्पर्धक हॉटसीटवर येतात. त्या प्रत्येकाला आपलेसे करून त्यांच्याबरोबर हा ज्ञानाचा खेळ खेळावा लागतो. प्रेक्षकांना मोहित करून टाकणारा आवाज आणि समोरच्याशी संवाद साधण्याचे कसब हे खेडेकरांचे गुण आहेत आणि त्यामुळेच स्पर्धकांना आणि प्रेक्षकांना ते आपलेसे वाटतात. 'कोण होणार करोडपती', सोम.-शनि. रात्री ९ वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर पहायला मिळेल.