Join us
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या रंगाच्या साडीतले या मराठी अभिनेत्रीचे फोटो एकदा पाहाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 12:58 IST

तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.

प्रत्येकाचा फॅशन फंडा वेगवेगळा असतो. प्रत्येकाची आपली स्टाईल असते. अभिनेत्री मयुरी देशमुखची एक वेगळी स्टाईल आहे. तिच्या इन्स्टावर नजर टाकली तर तुम्हाला कळेल की अमुकएक फॅशन तिने कधीच फॉलो केलेली नाही. मयुरी कधी वेस्टर्न आऊटफिटमध्ये दिसते तर कधी ट्रेडिशनल लूकमध्ये.सोशल मीडियावर अभिनेत्री मयुरी नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असते. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.

मयुरीने आपल्या फॅन्ससोबत नुकतेच साडीतले फोटोशूट शेअर केले आहे. या फोटोंमध्ये मयुरी वेगवेगळ्या पोझ देताना दिसतेय. काळ्या रंगाच्या साडीत मयुरीचे सौंदर्य आणखी खुललं आहे. साडीतले तिचे सौंदर्य बघून तिचे फॅन्सही घायाळ झाले आहेत. तिच्या या फोटोवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सिनेमा, नाटक आणि मालिका या विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर मयुरीने रसिकांच्या मनात एक वेगळी छाप निर्माण केली आहे. शेवटची मयुरी 'लग्नकल्लोळ' सिनेमात दिसली होती.लग्नकल्लोळ' हा धमाल विनोदी सिनेमा होता. यात मयुरीसह सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान मुख्य भूमिकेत दिसले होते. 

टॅग्स :मयुरी देशमुख