Join us
Daily Top 2Weekly Top 5

मयुरी देशमुखचा न्यू लूक पाहिलात का ?, लूक पाहून फॅन्स करतायेत अशा कमेंट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2019 06:30 IST

ग्लॅमर इंडस्ट्रीत अभिनयासोबतच स्टाईल स्टेंटमेंटला तितकंच महत्त्व असते.

ग्लॅमर इंडस्ट्रीत अभिनयासोबतच स्टाईल स्टेंटमेंटला तितकंच महत्त्व असते. प्रत्येकाची स्टाईल ही निराळी असते. सध्या मयुरी देशमुख तिच्या नव्या लूकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत आहेत.

 या फोटोमध्ये मयुरीचा न्यू लूक दिसतोय. मयुरीचा हा न्यू लूक तिच्या फॅन्सना भावला आहे.  तिच्या या फोटोवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावर मयुरी नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असते. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. 

सिनेमा, नाटक आणि मालिका या विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर मयुरीने रसिकांच्या मनात एक वेगळी छाप निर्माण केली आहे. आजोबा आणि नात यांच्या गोंडस तरीही संवेदनशील भावविश्वावर भाष्य करणारे नाटक म्हणजे 'डिअर आजो' हे मयुरीचे नाटक खूपच गाजले होते.

या नाटकाच्या लेखनाची धुराही मयुरीने सांभाळली होती. तसेच खुलता कळी खुलेना  या मालिकेत तिने साकारलेली मानसीची भूमिका ही खूपच गाजली होती. तसेच मयुरीचा  'लग्नकल्लोळ' सिनेमात शेवटची दिसली होती.  लग्नकल्लोळ' हा धमाल विनोदी सिनेमा होता त्यात मयुरीसह सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान मुख्य भूमिकेत दिसले होते.    

टॅग्स :मयुरी देशमुख