Join us
Daily Top 2Weekly Top 5

मयुरी देशमुखच्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 06:30 IST

ग्लॅमर इंडस्ट्रीत अभिनयासोबतच स्टाईल स्टेंटमेंटला तितकंच महत्त्व असते. प्रत्येकाची स्टाईल ही निराळी असते. सध्या मयुरी देशमुखचा सोशल मीडियावर बोलबाला पाहायला मिळतोय.

ठळक मुद्दे मयुरीचा हा लूक तिच्या फॅन्सना भावला आहेसोशल मीडियावर मयुरी नेहमीच अॅक्टिव्ह असते

ग्लॅमर इंडस्ट्रीत अभिनयासोबतच स्टाईल स्टेंटमेंटला तितकंच महत्त्व असते. प्रत्येकाची स्टाईल ही निराळी असते. सध्या मयुरी देशमुखचा सोशल मीडियावर बोलबाला पाहायला मिळतोय. त्याला कारणीभूत आहे तिचे इन्स्टाग्रामवरचे फोटो. 

या फोटोमध्ये तिने मरुण कलरच्या ड्रेसमध्ये परिधान केला आहे. मयुरीचा हा लूक तिच्या फॅन्सना भावला आहे.  तिच्या या फोटोवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावर मयुरी नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. 

सिनेमा, नाटक आणि मालिका या विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर मयुरीने रसिकांच्या मनात एक वेगळी छाप निर्माण केली आहे. आजोबा आणि नात यांच्या गोंडस तरीही संवेदनशील भावविश्वावर भाष्य करणारे नाटक म्हणजे 'डिअर आजो' हे मयुरीचे नाटक खूपच गाजले होते. या नाटकाच्या लेखनाची धुराही मयुरीने सांभाळली होती. तसेच खुलता कळी खुलेना  या मालिकेत तिने साकारलेली मानसीची भूमिका ही खूपच गाजली होती. लवकरच मयुरीचा  'लग्नकल्लोळ' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लग्नकल्लोळ' हा धमाल विनोदी सिनेमा असणार आहे यात मयुरीसह सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान मुख्य भूमिकेत दिसणार आहे.   

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकरभुषण प्रधान