Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mayasabha Trailer: 'तुंबाड' फेम राही बर्वेच्या 'मयसभा'चा जबरदस्त ट्रेलर, मराठमोळ्या वीणा जामकरने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 13:22 IST

तुंबाड सिनेमातून सर्वांना थक्क करणारा दिग्दर्शक राही अनिल बर्वेचा मयसभा सिनेमाचा खतरनाक ट्रेलर रिलीज झाला आहे. सर्वांना या ट्रेलरने थक्क करुन सोडलंय

चित्रपटाच्या टीझरला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर 'मयसभा - द हॉल ऑफ इल्युझन'च्या निर्मात्यांनी एका खास इव्हेंटमध्ये चित्रपटाचे ट्रेलर लॉन्च केले आहे. ३० जानेवारी २०२६ रोजी देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. जावेद जाफरी आणि मराठमोळी अभिनेत्री वीणा जामकर यांच्या अभिनयाची जुगलबंदी बघायला मिळत आहे. 'तुंबाड' या कल्ट क्लासिकनंतर 'मयसभा' हा दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांचा दुसरा चित्रपट आहे. आपली भावपूर्ण दृश्यभाषा आणि गुंतागुंतीच्या कथाकथन शैलीबद्दल प्रसिद्ध असलेले राही बर्वे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मानसिकतेमध्ये थेट प्रवेश करणार आहे. 'मयसभा - द हॉल ऑफ इल्युझन'मध्ये वेगळाच दृष्टीकोन आणि वास्तवाची प्रखर जाणीव बघायला मिळत आहे.  या चित्रपटात मुख्य भूमिका जावेद जाफरी यांची असून त्यांच्या सोबत मोहम्मद समद, वीणा जामकर आणि दीपक दामले हे कलाकार आहेत. प्रत्येकाचा परफॉर्मन्स चित्रपटाच्या गुंतागुंतीच्या कथानकात भर घालतो आणि चित्रपटास अधिक उत्कट बनवतो.

 आत्तापर्यंत मिळालेल्या प्रतिसादाविषयी दिग्दर्शक राही अनिल बर्वे म्हणतात, “अगदी पहिल्या लुकपासून ‘मयसभा’ला जे प्रेम मिळाले आहे, आणि त्याबद्दल जे कुतूहल लोकांच्या मनात आहे, ते आमच्यासाठी प्रोत्साहन देणारं आहे. माझ्यासाठी हा चित्रपट म्हणजे एक रोमांचक प्रवास होता. यामध्ये अशा कल्पनांचा शोध घेतला आहे, ज्या सिनेमा संपल्यावर देखील तुमच्या मनात रेंगाळत राहतील. हा ट्रेलर म्हणजे या जगात प्रवेश करण्यासाठी आम्ही दिलेले पहिले खरेखुरे निमंत्रण आहे.”  गिरीश पटेल आणि अंकुर जे सिंह यांच्यासह जिरकॉन फिल्म्सद्वारा निर्मित मयसभा - द हॉल ऑफ इल्युझनचे सह-निर्माते आहेत शामराव भगवान यादव, चंदा यादव, केवल हंडा आणि मनीष हंडा.असोसिएट प्रोड्युसर चिराग घमंडे असून आशिष निनगुरकर यांनी क्रिएटिव्ह कन्सल्टंट म्हणून काम केले आहे. हा चित्रपट समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांच्या नेतृत्त्वाखाली सादर आणि वितरित केला आहे पिकल एन्टरटेन्मेंटने. या चित्रपटाचे अन्य सादरकर्ते आहेत UFO-सिने मीडिया नेटवर्क, ज्याचे नेतृत्व पंकज जयसिंह करत असून एक वेगळाच अनुभव या सिनेमाच्या निमित्ताने मिळणार आहे. ३० जानेवारी २०२६ ला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : 'Mayasabha' Trailer: Rahi Barve's film with Veena Jamkar captivates audiences.

Web Summary : Rahi Barve's 'Mayasabha - The Hall of Illusion' trailer is out, starring Javed Jaffrey and Veena Jamkar. Set to release January 30, 2026, the film promises a unique perspective and a stark sense of reality, exploring ideas that linger beyond the screen.
टॅग्स :वीणा जामकरतुंबाडजावेद जाफरीबॉलिवूड