Join us
Daily Top 2Weekly Top 5

मसाबाने शेअर केला Unseen फॅमिली फोटो, आई नीना गुप्तासोबत वडील विवियन रिचर्ड दिसले जमीनवर बसलेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 16:49 IST

मसाबाने दोन फोटो शेअर केले आहेत.

फॅशन डिझाईनर मसाबा गुप्ताने तिचे आई-वडील निना गुप्ता आणि विवियन रिचर्ड यांच्याबरोबर बालपणीचे  फोटो शेअर केले. या फोटोत मसाबा आई नीना गुप्ताच्या मांडीवर दिसतेय तर विव्हियन रिचर्ड्स (वेस्ट इंडीजचा माजी क्रिकेटपटू) बाजूला बसलेले दिसतायेत. 

 

 मसाबाने दोन फोटो शेअर केले आहेत आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, 'माय वर्ल्ड माय ब्लड.'  या फोटोची सध्या इंटरनेटवर खूप चर्चा आहे. या फोटोत  मसाबा अवघ्या काही महिन्यांची दिसतेय.

या फोटोत मसाबा आई नीना गुप्ताच्या मांडीवर आहे व विव्हीयन रिचर्ड्स तिच्या बाजूला जमिनीवर बसले आहेत. फोटोत नीना गुप्ता रेड बॉर्डर असलेली साडी नेसलेल्या दिसातेयत तर विवियन रिचर्ड टी-शर्ट्स आणि शॉर्ट्समध्ये.  या पोस्टचा पुढील फोटो दुसरे एक कपल आहे.  मात्र, हे दोघे कोण आहेत याचा खुलासा मसाबाने केला नाही.  चाहते मसाबाच्या फॅमिली फोटोवर लाईकचा वर्षाव करत आहेत.

नीना गुप्ता 80 च्या दशकात वेस्ट इंडीजचे माजी क्रिकेटर विवियन रिचर्डसोबत नात्यात होत्या त्यांनी लग्न केले नाही. दोघांना एक मुलगी असून मसाबा तिचे नाव आहे. मुलीचा सांभाळ एकट्या नीना यांनी केला आहे. आज नीना यांची लेक मसाबा गुप्ता हिचेही बॉलिवूडमध्ये मोठे वजन आहे. बॉलिवूडच्या दिग्गज फॅशन डिझाईनरमध्ये तिचे नाव घेतले जाते. 

टॅग्स :नीना गुप्ता