Join us
Daily Top 2Weekly Top 5

नीना गुप्ताची लेक मसाबा आली चर्चेत, आदिती रावच्या एक्स पतीला करतेय डेट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 18:32 IST

सध्या दोघे गोव्यात क्वारांटाईन झाले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांची लेक मसाबा गुप्ताचा घटस्फोट होऊ 2 वर्षे झाली आहेत. घटस्फोटानंतर मसाबा तिच्या आयुष्यात पुढे नेऊन गेले आहेत.मसाबाने २०१५ मध्ये मधु मंटेनासोबत लग्न केले होते. मसाबाच्या घटस्फोटामुळे आई नीना गुप्ता दुखी होत्या. बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार मसाबाच्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीची एंट्री झाली आहे. घटस्फोटानंतर मसाबा आदिती रावचा एक्स पती सत्यदीप मिश्राला डेट करते आहे. रिपोर्टनुसार सध्या दोघे गोव्यात क्वारांटाईन झाले आहेत. 

मसाबा गुप्ता ही अभिनेत्री नीना गुप्ता आणि माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांची कन्या आहे. नीना आणि विवयन यांचे लग्न झालेले नाही. मधु मंटेना फँटम फिल्म्सचा को-फाउंडर आहेत. त्याने गजनी, रण, रक्त चरित्र, झुठा ही सही, मौसम या चित्रपटांची निर्मिती केली आहे. मसाबाचे म्हणाल तर ती बॉलिवूडची एक यशस्वी फॅशन डिझाईनर आहे.

आदिती आणि सत्यदीप यांचे लग्न २००९ मध्ये झाले होते. त्यावेळी ती केवळ २१ वर्षांची होती. २०१३ मध्ये दोघे वेगळे झाले. दोघांनी गुपचुप लग्न केले होते. सत्यदीपने नो वन किल्ड जेसिका या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. तो राधिका आपटेच्या फोबिया या चित्रपटात देखील झळकला होता

टॅग्स :नीना गुप्ता