Join us
Daily Top 2Weekly Top 5

सैफअली खान नव्हेतर या क्रिकेटवर जीवापाड प्रेम करायची अमृता सिंह, गुपचूप उरकला होता साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 18:29 IST

क्रिकेटर्स आणि बॉलीवुडच्या अभिनेत्रींच्या अफेअर्सच्या चर्चा कायम रंगत असतात. यांत आवर्जून उल्लेख करावा लागेल तो रवी शास्त्री आणि अमृता सिंह यांच्या अफेअर्स चर्चा कायम रंगल्या.

क्रिकेटर्स आणि बॉलीवुड कलाकारांवर रसिक जीवापाड प्रेम करतात. क्रिकेट आणि बॉलीवुड अगदी सुरुवातीच्या काळापासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे एकमेकांशी जोडले गेलेले आहे. क्रिकेटच्या मैदानात मॅच पाहण्यासाठी बॉलीवुड कलाकार आवर्जून हजर असतात. तर बॉलीवुडच्या पार्ट्यांमध्ये क्रिकेटर्स सामील होतात. क्रिकेट आणि बॉलीवुडचं नातं एवढ्यापुरतं मर्यादित नाही. 

गेल्या अनेक वर्षांत क्रिकेटर्स आणि बॉलीवुड कलाकारांमध्ये प्रेमाचं नातंही जुळलं आहे. क्रिकेटर्सवर अनेक बॉलीवुडच्या अभिनेत्री फिदा झाल्याची उदाहरणं आहेत. क्रिकेटर्स आणि बॉलीवुडच्या अभिनेत्रींच्या अफेअर्सच्या चर्चा कायम रंगत असतात. यांत आवर्जून उल्लेख करावा लागेल तो रवी शास्त्री आणि अमृता सिंह यांच्या अफेअर्स चर्चा कायम रंगल्या. रवी शास्त्रीला पाहण्यासाठी अमृता नेहमी स्टेडियममध्ये दिसून यायची. पण सर्वांसमोर कधीही नात्याची कबुली न देता दोघांनी ब्रेकअप केले. 

अमृता सिंहने नंतर सैफअली खानसह लग्न केले असले तरीही कधी काळी ती क्रिकेटर रवी शास्त्रीच्या प्रेमात बुडाली होती. मात्र रवी शास्त्रींना अभिनेत्री असलेली पत्नी म्हणून नको होती.घराची जबाबदारी सांभाळणारीशीच ते लग्न करणार असल्याची अट त्यांनी ठेवली होती. मात्र त्यावेळी अमृता तिच्या कामात खूप व्यस्त होती. मध्येच करिअर सोडणे तिला त्यावेळी शक्य नव्हते. काही वर्ष काम केल्यानतंर फुल टाईम गृहिणी बनणार असल्याचेही तिने सांगितले होते. इतकेच काय तर दोघांनी गुपचूप साखरपुडाही केल्याचे बोलले गेले.

तरीही रवी शास्त्री आणि अमृता सिंहची लव्हस्टोरी फार काळ टिकू शकली नाही. 1990 मध्ये रवी यांनी रितू सिंगशी विवाह केला तर, अमृताने 1991 मध्ये सैफ अली खानशी लग्न केलं. अमृताचे सनी देओल, विनोद खन्ना यांच्यासोबतदेखील नाव जोडले गेले होते. मात्र नंतर तिने स्वतःपेक्षा वयाने 12 वर्षांनी लहान असलेल्या सैफ अली खानसोबत लग्न थाटून सगळ्यांना हैराण केले.

या दोघांचेही हे नाते फार काळ टिकले नाही आणि 2004 मध्ये घटस्फोट घेत वेगळे झाले. 2012 मध्ये सैफने त्याच्यापेक्षा वयाने 10 वर्षांनी लहान असलेल्या करीना कपूरसोबत लग्न करत आयुष्याला नव्याने सुरुवात केली.

टॅग्स :अमृता सिंगसैफ अली खान