Join us
Daily Top 2Weekly Top 5

मंजू कपूर यांच्या बेस्ट सेलर कादंबरीवर आधारीत 'द मॅरिड वूमन' वेबसीरिज, या दिवशी येणार भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 18:58 IST

'द मॅरेड वूमन' वेबसीरिजचे पोस्टर नुकतचे प्रदर्शित करण्यात आले आहे.

अल्ट बालाजी आणि झी यांनी अलीकडेच त्यांच्या आगामी 'द मॅरेड वूमन' प्रोजेक्टची घोषणा केली आहे, जो लेखिका मंजू कपूरच्या बेस्ट सेलर कादंबरी 'अ मॅरेड वूमन' वर आधारित आहे. नुकताच याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. यात रिधी डोगरा आणि मोनिका डोगरा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

‘अ मॅरीड वूमन’ हे महिलांविषयी आणि समाजाने महिलांवर लादलेल्या अटींबद्दल आणि त्यांनी त्यांच्यातील स्व शोधण्यावर आधारित एक शहरी नात्यांचे नाट्य असलेले कथानक आहे. यामध्ये रिधी डोगरा आणि मोनिका डोगरा यांच्या मध्यवर्ती भूमिका असून इमाद शाह, दिव्या सेठ शाह, नादिरा बब्बर आणि सुहास आहुजा इत्यादी उल्लेखनीय कलाकारांचा समावेश आहे.

एक व्हिडिओ देखील प्रदर्शित केला आहे, ज्यात प्रसिद्ध लेखिका मंजू कपूर देखील दिसत आहेत. व्हिडिओमध्ये, त्या एक लेखक म्हणून त्यांच्या प्रवासाविषयी सांगतानाच, नव्वदच्या दशकात विवाहित महिलांना भेडसावणाऱ्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे ज्या 2021 मध्ये देखील तंतोतंत लागू पडतात. यासोबतच, रिधी डोगरा आणि मोनिका डोगरा असलेले आकर्षक पोस्टर शोच्या भावना आणि त्याच्या कथनाचे उत्तम वर्णन करताना दिसते.

 ‘द मॅरिड वूमन’ ८ मार्चपासून अल्ट बालाजी आणि झी ५ वर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहे.

टॅग्स :रिद्धी डोगराएकता कपूर