Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तू सौभाग्यवती हो' मालिकेत ऐश्वर्या आणि सूर्यभान यांची लगीनघाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 14:09 IST

छोट्या पडद्यावरील मालिका 'तू सौभाग्यवती हो' अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळू लागली आहे.

छोट्या पडद्यावरील मालिका 'तू सौभाग्यवती हो' ही मालिका दिवसेंदिवस रंजक आणि रसिकांची लाडकी मालिका बनत चालली आहे. कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी आणि मालिकेचे कथानक रसिकांना भावते आहे. छोट्या पडद्यावरील मालिका 'तू सौभाग्यवती हो' अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळू लागली आहे. 'तू सौभाग्यवती हो' मालिकेमध्ये लगीन घाई सुरु झाली आहे.

येत्या काही दिवसात ऐश्वर्या आणि सूर्यभान हे लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. करारी सूर्यभान आणि अल्लड ऐश्वर्या यांच्या लग्नाचा थाट तितकाच असणार आहे. हळद, मेहेंदी, लग्नात होणारे इतर रीतिरिवाज हे सगळं प्रेक्षकांना ऐश्वर्या आणि सूर्यभान यांच्या लग्नात पाहायला मिळणार आहे. पण सूर्यभान ऐश्वर्याला बायकोचा दर्जा देऊ शकेल का? आणि त्याची मुलं तिला आपली आई मानतील का? हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं असणार आहे. बांधले जाणार बंध नव्या नात्याचे, जुळणार का नाते हे मनाशी मनाचे? पाहा, तू सौभाग्यवती हो - विवाह सप्ताह - १ जूनपासून संध्या. ७ वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

टॅग्स :सोनी मराठी