Join us

क्रिकेटचा डाव आता किचनमध्ये; 'किचन कल्लाकार'मध्ये प्रसिद्ध क्रिकेटपटूंची हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 18:28 IST

Kitchen kalakar: कलाविश्वापासून ते राजकीय व्यक्तीमत्त्वांपर्यंत अनेक जण या शोमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. यामध्येच आता या मंचावर क्रीडाविश्वातील तीन दिग्गज खेळाडून येणार आहेत.

काही दिवसांपूर्वीच छोट्या पडद्यावर 'मस्त मजेदार किचन कल्लाकार' ( Kitchen Kallakar) हा नवा कुकरी शो सुरु झाला आहे. या कार्यक्रमात अभिनेता प्रशांत दामले (Prashant Damle) परिक्षकाच्या भूमिकेत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर अभिनेता संकर्षण क-हाडे सूत्रसंचालकाची भूमिका बजावत आहे. आतापर्यंत या शोमध्ये अनेक दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली आहे. कलाविश्वापासून ते राजकीय व्यक्तीमत्त्वांपर्यंत अनेक जण या शोमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. यामध्येच आता या मंचावर क्रीडाविश्वातील तीन दिग्गज खेळाडून येणार आहेत.

झी मराठी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या शोचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये प्रसिद्ध क्रिकेटपटू विनोद कांबळी, अमोल मुजुमदार आणि सलील अंकोला हे तीन क्रिकेटपटू दिसून येत आहेत. त्यामुळे किचन कल्लाकारच्या आगामी भागात हे क्रिकेटपटू सहभागी होणार असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे या मंचावर आल्यानंतर या तिघांना वेगवेगळ्या पदार्थांसह काही मजेदार खेळही खेळावे लागणार आहेत.

दरम्यान, या शोमध्ये विनोद कांबळी, अमोल मुजुमदार त्यांचे काही रंजकदार किस्सेही शेअर करणार आहेत. त्यामुळे आता क्रिकेटचा डाव थेट किचनमध्ये रंगणार असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या नेटकरी या आगामी भागाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारसेलिब्रिटीप्रशांत दामले