Join us

लोक आग्रहाखातर अरुंधतीने घेतला उखाणा; अनिरुद्ध- अशुतोषला डावलून 'या' व्यक्तीचं घेतलं नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 16:35 IST

Aai kuthe kay karte: अनिरुद्धपासून विभक्त झालेल्या अरुंधतीची आशुतोषसोबत चांगली मैत्री झाली आहे. त्यामुळे ती उखाण्यात अनिरुद्धचं नाव घेते की आशुतोषचं हा प्रश्न सगळ्यांना पडला होता.

छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' या मालिकेतील देशमुख कुटुंबात दररोज नवनवीन घटना, घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत या मालिकेत प्रत्येक सण, उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला आहे. यामध्येच श्रावण महिन्या सुरु झाल्यामुळे देशमुख यांच्या घरात खास मंगळागौरीची पूजाही ठेवण्यात आली. विशेष म्हणजे यावेळी अरुंधतीने उखाणा घेत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

काही दिवसांपूर्वीच देशमुखांच्या घरात अनघा आणि संजनाची पहिली मंगळागौरी साजरी करण्यात आली. यावेळी देशमुखांच्या घरातील सगळ्या स्त्रिया छान नटूनथटून मिरवत होत्या. मंगळागौरीची पूजा, खेळ खेळून झाल्यावर सगळ्यांनी उखाणे घेतले. यावेळी काही स्त्रियांनी अरुंधतीलाही उखाणा घ्यायला लावला. विशेष म्हणजे अरुंधतीने घेतलेल्या उखाण्यामुळे उपस्थित सगळेच शांत झाले.

अनिरुद्धपासून विभक्त झालेल्या अरुंधतीची आशुतोषसोबत चांगली मैत्री झाली आहे. त्यामुळे ती उखाण्यात अनिरुद्धचं नाव घेते की आशुतोषचं हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. मात्र, अरुंधतीने या दोघांपैकी कोणाचंही नाव न घेता स्वत:चच नाव उखाण्यात घेतलं.

दरम्यान, आयुष्याची वाट लढायला निघालेली मी एकट्याने हा मार्ग नीट पार पाडेन असा आशय असलेला उखाणा अरुंधतीने घेतला. त्यामुळे तिच्या या उखाण्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. 

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाटिव्ही कलाकारटेलिव्हिजनमधुराणी प्रभुलकर