Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध टीव्ही खलनायिका झळकणार 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत, काय असेल भूमिका? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 14:52 IST

स्टार प्रवाहवरील 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेचा दुसरा प्रोमो नुकताच प्रसारित करण्यात आला आहे.

Gharo Ghari Matichya Chuli Serial :स्टार प्रवाह या मराठी वाहिनीवर 'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका नुकतीच प्रसारित करण्यात आली आहे. 'रंग माझा वेगळा फेम' अभिनेत्री रेश्मा शिंदे या मालिकेत मुख्य भुमिका साकारत आहे. १८ फेब्रुवारीपासून या मालिकेचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला.

नात्यांच महत्व अधोरेखित करणाऱ्या मालिका पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता असल्याचं चित्र आहे. नुकताच या मालिकेचा दुसरा प्रोमो चाहत्यांबोबत शेअर करण्यात आला आहे. या मालिकेच्या दोन्ही प्रोमोंना चाहत्यांची भरभरून पसंती मिळाली. जानकी अर्थात रेश्मा शिंदेची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. पण मालिकेच्या दुसऱ्या प्रोमोमध्ये सहकलाकारांचे चेहरे प्रेक्षकांचे समोर आले. आता वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये एक परिचयाचा चेहरा पाहायला मिळत आहे. 

घाडगे & सून,“जीव माझा गुंतला” तसेच 'मुलगी झाली हो' या मालिकेतून नावारुपाला अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकर. या मालिकेतील सगळीच पात्र प्रेक्षकांच्या अजूनही स्मरणात आहेत. आता ही अभिनेत्री 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत झळकणार आहे.  सविता प्रभुणे, रेश्मा शिंदे, प्रमोद पवार, उदय नेने, भक्ती देसाई, सुनील गोडसे अशी दिग्गज कलाकार मंडळी या मालिकेतून भेटीला येणार आहेत. नव्या प्रोमोनूसार प्रतीक्षा मालिकेत नकारात्मक भूमिका साकारण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :रेश्मा शिंदेसविता प्रभूणेस्टार प्रवाह