Join us

"कलाकारावर बाटल्या फेकून मारणे हा स्वभाव...; प्रसिद्ध गायिका आर्या आंबेकरने व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 12:39 IST

सुप्रसिद्ध मराठी गायिका, अभिनेत्री आर्या आंबेकरने (Aarya Ambekar) तिच्या गोड आवाजाने प्रेक्षकांची मनं जिंकली.

Aarya Ambekar: सुप्रसिद्ध मराठी गायिका, अभिनेत्री आर्या आंबेकरने (Aarya Ambekar) तिच्या गोड आवाजाने प्रेक्षकांची मनं जिंकली. उत्तम आवाज आणि सुंदर अभिनय अशा दुहेरी भूमिका साकारणारी आर्या आंबेकर 'सा रे ग म पा लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमातून घराघरात पोहोचली. 'हृदयात वाजे समथिंग', 'बाई गं', 'कितीदा नव्याने तुला आठवावे' यांसारख्या अनेक गाण्यांमधून ती प्रसिद्धझोतात आली आहे. आपल्या सुरेल आवाजाने आर्याने अनेकांना मंत्रमुग्ध केलं आहे. आर्याचा चाहतावर्ग सुद्धा फार मोठा आहे. त्यात अलिकडेच आर्याने एका मुलाखतीमध्ये केलेल्या वक्तव्याने ती चर्चेत आली आहे. 

अगदी काही दिवसांपूर्वीच आर्या आंबेकरने 'मिर्ची मराठी'ला  मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये एक लाईव्ह परफॉर्मिंग आर्टिस्ट तुला आता आपल्या देशातील इन्फ्रास्ट्रक्चर कसं वाटतंय किंवा त्यात कोणत्या एक-दोन गोष्टी आणखी चांगल्या होऊ शकतात. ज्याने एक गायिका म्हणून तुझा अनुभव चांगला होईल? असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर बोलताना आर्या म्हणाली, "मला सगळ्यात आधी इन्फ्रास्ट्रक्चर पेक्षा वगैरे लोकांनी स्वत: मध्येच बदल करायला हवेत, असं मला वाटतं. एखाद्या कलाकारावर तुम्ही काहीही फेकून माराल किंवा तुम्हाला तो भेटायला आलाय तर तुम्ही त्याला हाताला खेचून खालीच ओढाल हा स्वभावच मुळात बदलायला पाहिजे. कलाकारांचा आदर करणं गरजेचं आहे."

त्यानंतर आर्या म्हणाली, "आता आपल्याकडे एवढं फार होत नाही. म्हणजे कलाकारांचा आदर करायचा हे आपले संस्कारच आहेत. पण, असे अनेक व्हिडीओ मी पाहिले आहेत की ज्यामध्ये एखादा कलाकार गातोय आणि कोणीतरी त्याच्यावर बाटलीच फेकून मारली. माझं म्हणणं आहे की तुम्हाला यातून काय साध्य होतं? फक्त लक्ष वेधण्यासाठी असं करायचं? पण लोकांच्या ऐकण्यात आणि स्वभावामध्ये बदल व्हायला हवं." असं म्हणत आर्याने आपल्या मनातील खंत व्यक्त केली. 

टॅग्स :आर्या आंबेकरमराठी गाणीसेलिब्रिटी