Join us
Daily Top 2Weekly Top 5

"तुझं आयुष्यात येण माझ्यासाठी....", केदार शिंदेंनी पत्नीसाठी लिहिलेली 'ती' पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 16:54 IST

मराठी सिनेइंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते केदार शिंदे ( Kedar Shinde) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहेत. त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट क्षणात व्हायरल होतात.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते केदार शिंदे ( Kedar Shinde) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहेत. त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट क्षणात व्हायरल होतात. सध्या त्यांची अशीच एक खास पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय. अलीकडेच त्यांच्या लग्नाला 26 वर्षे पूर्ण झाली या निमित्त त्यांनी पत्नी बेला शिंदेसाठी लिहिलेली खास पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. 

ही पोस्ट लिहिताना त्यासोबत त्यांनी एक खास फोटोही शेअर केला आहे. या फोटोत ते पत्नीच्या खांद्यावर डोकं ठेवून डोळे मिटून दिसतायेत. तर त्यांची पत्नी बेला बाहेर काहीतरी बघतायेत. या फोटो फार जुना दिसतोय. 

आज आपल्या लग्नाला 26 वर्ष पुर्ण झाली. खरतर तू पळून जाऊन लग्न करण्याच्या निर्णयाला होकार दिलास, तेव्हा या क्षेत्रात मी धडपड करत होतो. तुझं आयुष्यात येण माझ्यासाठी भाग्यशाली ठरलं. म्हणजे एकाच रात्रीत आकाशाला हात लागले असं नाही. मात्र एक दिशा मिळाली पुढच्या प्रवासाची. आजही आपण धडपडतोच आहोत. स्वामी कृपेने दोन वेळेच्या जेवणाची व्यवस्था चोख आहे. मात्र, तुझी खुप स्वप्न पूर्ण करण्यात मी तोकडाच पडतोय. माझा ECG सारख्या करीयर ग्राफ! तू नेहमीच प्रत्येक चढ उतार क्षणी,साथ देतेयसं!!स्वामी म्हणतात “ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” आणि तुझं म्हणणं असतं “मी तुझ्या सोबत आहे”. तुम्हा दोघांच्यामुळेच मी पुढची वाटचाल करणार आहे. मला “सना” सारखं गोड स्वप्न प्रत्यक्षात दिलस. तुम्हा दोघांसाठीच आयुष्यभर जगेन, धडपडेन..... अशी पोस्ट त्यांनी या फोटोसोबत लिहिली आहे. 

टॅग्स :केदार शिंदे