Join us  

स्वामी समर्थांच्या चरणी लीन झाला स्वप्नील जोशी, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 3:36 PM

मराठी सिनेसृष्टीतील असे काही कलाकार आहेत, जे स्वामींचे भक्त आहेत.

स्वामी समर्थ हे अनेकांचं दैवत आहे. मराठी सिनेसृष्टीतील असे काही कलाकार आहेत, जे स्वामींचे भक्त आहेत.  यातीलच एक कलाकार म्हणजे अभिनेता स्वप्नील जोशी. अक्कलकोट विराजमान श्री स्वामी समर्थ महाराजांचा आज १० एप्रिल रोजी प्रकटदिन झाला. यादिवशी स्वप्नीलनंही स्वामींचं दर्शन घेतलं आणि पुजेत सहभागी झाला. याचा एक व्हिडीओ त्यानं सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 स्वप्नील जोशी हा एकटाच नाही तर त्याच्या घरीही सगळेच स्वामींचे भक्त आहेत. स्वप्नीलनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये घरातील सर्वजण अक्षरश: स्वामीभक्तीत दंग झाल्याचं दिसून आलं. स्वप्नीलच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत.स्वप्नीलचे आई-वडील स्वामी भक्त असल्याने त्याच्यावर बालपणापासूनच स्वामींच्या भक्तीचे संस्कार घडले गेले. अभिनेता स्वप्नीलला स्वामींच्या भक्तीचा प्रत्यय वारंवार आला आहे. स्वामी सतत आपल्या पाठीशी आहेत, असं तो म्हणतो. 

स्वप्नील जोशीने उत्तम अभिनय आणि पर्सनालिटी यांच्या जोरावर स्वप्नीलने कलाविश्वात त्याचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात करणारा स्वप्नील कलाविश्वासह सोशल मीडियावरही कमालीचा सक्रीय आहे. त्यामुळे त्याच्या प्रत्येक पोस्टची नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत असते.  स्वप्नीलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, तो पुरस्कार  'नाच गं घुमा' या आगामी चित्रपटातून स्वप्नील जोशी निर्माता म्हणून पदार्पण करीत आहे. तसेच १९ वर्षांनंतर येणाऱ्या "नवरा माझा नवसाचा-२' या चित्रपटातून तो प्रक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

टॅग्स :स्वप्निल जोशीसेलिब्रिटी