Join us
Daily Top 2Weekly Top 5

सैराटचा हैदराबादमध्येही झिंगाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2016 21:26 IST

संपूर्ण जगातील मराठी रसिकांना गेल्या ९ आठवड्यापासून याड लावणाºया ‘सैराट’चा स्पेशल शो आज  हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी ...

संपूर्ण जगातील मराठी रसिकांना गेल्या ९ आठवड्यापासून याड लावणाºया ‘सैराट’चा स्पेशल शो आज  हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी नागराज मंजुळे, रिंकू राजगुरू तसेच सैराटची टीम उपस्थित होती. या टीमला तेलंगणातील महाराष्ट्र मित्र मंडळाने आमंत्रित केले होते. सैराट लवकरच तेलगू भाषेतही बनवला जाणार आहे. त्यामुळे दक्षिणेतही सैराटचा फिव्हर कायम राहतो का, ते पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सैराटच्या शो साठी आलेल्यांनी कलाकारांसोबत डान्सही केला.शो संपल्यानंतर मराठी प्रेक्षकांनी सैराटच्या टीमसोबत संवाद साधला. यावेळी सैराटच्या सर्वच चाहत्यांनी झिंगाट गाण्यावर ठेका धरला होता. अभिनयाने अवघ्या महाराष्ट्राला याड लावणारी आर्ची देखील चाहत्यांसोबत थिरकली.