‘युथ’ बॉक्स आॅफिसवर फेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2016 16:16 IST
मराठी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले, सतिश पुळेकर आणि नेहा महाजन अभिनित ‘युथ’ चित्रपटाला बॉक्स आॅफिसवर विशेष यश ...
‘युथ’ बॉक्स आॅफिसवर फेल
मराठी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले, सतिश पुळेकर आणि नेहा महाजन अभिनित ‘युथ’ चित्रपटाला बॉक्स आॅफिसवर विशेष यश मिळाले नसल्याने बॉक्स आॅफिसवर फेल होण्याचे चिन्ह दिसत आहे. युथ या चित्रपटाची कथा आहे आजच्या युवकांची. ६ तरुण तरुणी पिकनीकसाठी जातात. या पिकनिकदरम्यान त्यांना वाटेत एक गाव लागतं. या गावात दुष्काळ असल्यामुळे लोक पाण्यासाठी वणवण भटकताना दिसतात. या गावातील सगळ्या गोष्टी या तरुणांना अस्वस्थ करतात. मग सुरु होतो एक अनोखा लढा. अशा काहीशा पार्श्वभूमीवर हा सिनेमा आधारित आहे. सिनेमातील युवा कलाकारांच्या अभिनयाचे मात्र कौतुक होत आहे.